पंधरा वर्षांच्या दोन मुलीशी विनयभंगासह लैगिंक अत्याचार

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांच्या दोन मुलींशी चारजणांच्या एका टोळीने विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत हुसैन आणि शुभम नावाच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत फिदा आणि आतिक नावाच्या दोन तरुणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१५ वर्षांची पिडीत मुलगी शीव-ट्रॉम्बे परिसरात राहत असून हुसैन हा तिचा परिचित मित्र आहे. त्याने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने त्याच्या बॅनर बनविण्याच्या कार्यालयात तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हुसैनचा मित्र फिदा याने पिडीत मुलीची पंधरा वर्षांच्या मैत्रिणीसोबत अश्‍लील चाळे करुन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. फिदासह आतिकने या मैत्रिणीशी अनेकदा अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच शुभमने शीतपेयातून गुंगीचे तसेच नशा-भूल येणार्‍या विषारी पदार्थ टाकून पिडीत मुलीवर बेशुद्धावस्थेत लैगिंक अत्याचार केला होता. अशा प्रकारे जानेवारी २०२३ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हुसैन आणि शुभमने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार तर फिदा आणि आतिकने पिडीत मुलीच्या मैत्रिणीशी अनेकदा अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या चौघांकडून सतत सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून पिडीत मुलीने घडलेला प्रकार चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून संबंधित चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या मुलीच्या तक्रारीवरुन हुसैन, फिदा, आतिक आणि शुभम या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ६र्४ें ६५ (१), ६९, ७४, ७८, १२३ भारतीय न्यास सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हुसैन आणि शुभम या दोघांना पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या फिदा आणि आतिक या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page