दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार
विनयभंगासह लैगिंक अत्याचारप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – मालाड येथे चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग तर चौदा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही आरोपी बळीत आणि पिडीत मुलीच्या परिचित असून या दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
14 वर्षांची पिडीत मुलगी ही कांदिवली परिसरात राहत असून याच परिसरात आरोपी विनोद नावाचा 35 वर्षांचा आरोपी राहतो. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही मुलगी गणेश मंदिर परिसरातून जात होती. यावेळी आरोपीने तिचा हात पकडून तिला एका निर्जनस्थळी घेऊन आला. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनतर त्याने तिला सोडून दिले होते. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती.
नंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगून तिने विनोदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत एका चार वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिचित आरोपीने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 28 वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड येथे राहत असून बळीत तिची चार वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात शेर नावाचा एक 25 वर्षांचा तरुण राहतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आरोपीने बळीत मुलीला त्याच्या घरी आणून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्या ओठाचा चावा घेऊन नकोसा स्पर्श करुन तिच्याशी अश्लील चाळे केले होते. घरी आल्यानंतर
हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने कुरार पोलिसांत शेरविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.