नशा करण्यासाठी लुटमार करुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपी तरुणाविरुद्ध रॉबरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मार्च 2026
मुंबई, – नशा करण्यासाठी लुटमार करुन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एका गर्दुल्ल्याने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आहे. याप्रकरणी इस्तियाक नावाच्या एका 24 वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध मालवणी पोलिसांनी रॉबरीसह विनयभंग आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पंधरा वर्षांची बळीत अल्पवयीन मुलगी मालाडच्या बांगुरनगर परिसरात रात असून सध्या शिक्षण घेते. मालाडच्या मालवणी परिसरात ती ट्यूशनसाठी येते मंगळवाारी 10 मार्चला ती नेहमीप्रमाणे ट्यूशनला आली होती. ट्यूशन संपल्यानंतर सायंकाळी चार वाजता ती घरी जाण्यासाठी निघाली होती. याच दरम्यान तिथे इस्तियाक आला होता. काही कळण्यापूर्वीच त्याने तिला मागून जोरात घट्ट मिठी मारुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला.

तिचा गळा पकडून त्याने तिच्याकडे नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली, तिने पैसे देण्यास नकार देताच त्याने तिच्या पॅण्टच्या खिशातून दिडशे रुपये काढून तिच्या गालावर चार ते पाच चापट मारल्या. काही वेळानंतर खिशातून ब्लेड काढून त्याने तिला जिवे मारण्याची, तिचे केस जाळून टाकण्याची धमकी देत हा प्रकार तिच्या वडिलांसह पोलिसांना सांगितल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो घटनास्थळाहून पळून गेला.

भरदिवसा, भररस्त्यात घडलेल्या या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने घरी गेल्यानंतर तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवशी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी इस्तियाकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध रॉबरीसह विनयभंग आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page