मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुलुंड येथे एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन सुरक्षारक्षकांनी तर घाटकोपर येथे एका अठरा वर्षांच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवर तिघांनी लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलुंड आणि टिळकनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्यचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही सुरक्षारक्षकांना मुलुंड पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या इतर तिघांचा टिळकनगर पोलिसांकडून शोध सुरु आहे. दोन्ही पिडीत मुली गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या गुन्ह्यांतील 42 वर्षांचे तक्रारदार मुलुंड परिसरात असून ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांची पिडीत तेरा वर्षांची मुलगी आहे. आरोपी अनुक्रमे 46, 25 आणि 26 वयोगटाचे असून ते तिघेही याच परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. आरोपी व पिडीत एकमेकांच्या परिचित आहेत. जानेवारी ते एप्रिल महिन्यांत या तिघांनी वेगवेगळ्या दिवशी पिडीत मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार तिच्या वडिलांना समजताच त्यांना धक्काच बसला होता. चौकशीनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली होती. अटकेनंतर तिघांनाही विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या घटनेत एका अठरा वर्षांच्या तरुणीवर तिघांनी लैगिंक अत्याचार केला. ही मुलगी घाटकोपर येथे राहत असून तिची आई घरकाम करते. पिडीत मुलगी मानसिक रुग्ण असून तिला डिसेंबर 2024 रोजी तिच्या आई राजावाडी हॉस्पिटलमध्ये घेऊ आली होती. यावेळी भरत, नदीम व अन्य एका तरुणाने तिच्यावर जवळच असलेल्या निर्जनस्थळी लैगिंक अत्याचार केला होता. ही मुलगी सध्या आठ महिन्यांची गरोदर आहे. हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात येताच तिने टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.