बलात्काराची केस मागे घेण्यासाठी धमकावून मोबाईल चोरी
बळीत मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जानेवारी २०२५
मुंबई, – बलात्काराची केस मागे घेण्याासाठी धमकावून सतरा वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करुन तिचा मोबाईल मित्राने पळवून नेल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी २० वर्षांच्या आरोपी मित्राविरुद्ध नवघर पोलिसांनी मोबाईल चोरी, विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या मित्राच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी कोपरी पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल असून आता त्याच्याविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील तक्रारदार बळीत मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतरा वर्षांची बळीत मुलगी ठाणे येथे राहत राहत असून २० वर्षांचा आरोपी हा तिचा आहे. या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. गेल्या वर्षी तिने त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरु होता. शनिवारी रात्री पावणेदहा वाजता ती मुलुंड येथून तिच्या घरी जात होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला धमकावून तुझाशी बोलायचे आहे असे सांगून त्याने तिला तिने त्याच्यविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात केलेली लैगिंक अत्याचाराची तक्रार मागे घेण्याची धमकी दिली होती. ही केस बंद कर नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती.
मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग करुन तिचा मोबाईल घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार नवघर पोलिसांना सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी जबरी चोरीसह विनयभंग आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
अकरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
दुसरी घटना विक्रोळी येथे घडली. घरासमोरच खेळत असलेल्या अकरा वर्षांच्या दोन मुलींकडे पाहून अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याप्रकणी एका ४४ वर्षांच्या आरोपीविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुली आणि आरोपी एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिला ही विक्रोळी येथे राहत असून तिला अकरा वर्षांची एक मुलगी आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता ही मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोरच खेळत होती. यावेळी त्यांच्या शेजारीच राहणार्या आरोपीने दोघींकडे पाहून अश्लील इशार्याने बोलण्याचा प्रयत्न केा. त्याने पाहून विविध अश्लील इशारे करत होता. त्यानंतर स्वतची पॅण्ट काढून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजताच तिने पार्कसाईट पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.