चौदा वर्षांच्या मुलीवर पित्यासह दोन भावाकडून अत्याचार

एक ते दिड वर्षांपासून लैगिंक अत्याचार सुरु असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्यासह दोन भाऊ आणि अन्य एका परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली अहो. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्यासह दोन्ही भाऊ आणि परिचित आरोपी अशा चौघांनाही मुलुंड पोलिसांनी अटक केली. एक भाऊ अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एक ते दिड वर्षांपासून संबंधित आरोपीकडून पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला मुलुंड पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला, मात्र अधिक तपशील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

पिडीत चौदा वर्षांची मुलगी ही मुलुंड येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. चार आरोपीपैकी एक आरोपी तिचे वडिल तर इतर दोघेजण तिचे सख्खे भाऊ आहेत. जानेवारी 2024 पासून तिच्या वडिलांसह दोन्ही भाऊ तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होते. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून ती तिघेही तिला जिवे मारण्याची धमकी देत होते. याच दरम्यान तिच्या परिचित अन्य एका 50 वर्षांच्या आरोपीने तिला एका दुकानाच्या गोदामात आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. 1 जानेवारी ते 27 नोव्हेंबर 2024 या कालावधीत या चौघांनी तिचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. या अत्याचाराला ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते.

अलीकडेच हा प्रकार सीडब्ल्यूसी या सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास आला होता. पिडीत मुलीची या पदाधिकार्‍यांनी आपुलकीने चौकशी केली होती. या चौकशीतून तिने घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्यावर तिचे वडिल, दोन भाऊ आणि तिच्या परिचिताकडून लैगिंक अत्याचार होत असल्याची कबुली दिली होती.या घटनेनंतर या पदाधिकार्‍यांनी मुलुंड पोलिसांना तपास करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या संपूर्ण प्रकरणाची मुलुंड पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत पिडीत मुलीच्या जबानीत तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यांनतर मुलुंड पोलिसांकडून संबंधित चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच 42 वर्षांच्या आरोपी पिता, 18 आणि सोळा वर्षाचे दोन भाऊ आणि 50 वर्षांचा परिचित आरोपी अशा चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर अटक केलेल्या इतर तिघांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोमवारी उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांनी प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page