मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ डिसेंबर २०२४
मुंबई, – मानसिक व शारीरिक शोषणा कंटाळून प्राची केवल पटेल या २८ वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली होती. या घटनेनंतर बारा दिवसांनी तिच्या पतीसह सासू-सासर्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. केवल विनेश पटेल, रमिला विनेश पटेल आणि विनेश पटेल अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
२६ वर्षांची क्रिश्नी शांतीलाल पटेल ही तरुणी तिच्या आई-वडिल आणि भावासोबत मालाड परिसरात राहते. प्राची ही तिची मोठी बहिण असून तिचे २० नोव्हेंबर २०१९ रोजी केवल पटेलशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर ती तिच्या मुलीुंड येथील बीपीएस कंपाऊंड, निष्ठा अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली होती. केवलचा लेबर कॉन्ट्रक्टरचा व्यवसाय असून प्राची ही पदवीधर आहे. तिने कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला असून एका खाजगी कंपनीत डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात ती सोशल मिडीया हँडलर म्हणून काम करत होती. तिचे प्राचीसोबत खूप चांगले संबंध असल्याने ते दोघीही एकमेकांचे अनेक गुपीत शेअर करत होते. लग्नानंतर प्राचीचे अडीच वर्ष चांगले गेले होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिचे तिच्या पतीसोबत वाद सुरु होते. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिच्यावर त्याने अनेक निर्बंध घातले होते. तिला सतत अपमानास्पद वागणुक देत होता. तिला माहेरी पाठवत नव्हता. तिच्या मित्रमैत्रिणीशी बोलू देत नव्हता. कामावरुन उशीर झाला ती तिच्याशी वाद घालत होता. तिला घरात मोलकरणीप्रमाणे वागणुक देत होता. गेल्या काही दिवसांपासून तिचा केवलकडून सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. तिची सासू रमिला आणि सासरे विनेश पटेल तिला लग्नात हुंडा दिला नाही. दागिने आणले नाही तसेच ती घरात पगार देत नाही म्हणून तिच्याशी सतत वाद घालून तिलाद टोमणे मारत होते. याबाबत तिने क्रिश्नीला सर्व माहिती सांगितली होती.
गेल्या काही दिवसांपासून पतीसह सासू-सासरेकडून सुरु असलेल्या मानसिक शोषणाला प्राची ही कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे १९ नोव्हेंबरला तिने घरात स्वतला कोंडून घेतले होते. बराच वेळ तिने दरवाजा उघडलानाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी प्राचीने तिच्या राहत्या घरी पंख्याा ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. सर्व विधी पार पडल्यांतर क्रिश्नीला तिच्या नातेवाईकासह प्राचीच्या मित्रमैत्रिणीने प्राचीचा सुरु असलेल्या छळाबाबत माहिती दिली होती. तिच्या आत्महत्येला केवल, रमिला आणि विनेश पटेल हेच जबाबदार होते. त्यामुळे क्रिश्नीने मुलुंड पोलिसांत या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्राचीचा पती केवल पटेल, सासू रमिला पटेल आणि सासरे विनेश पटेल या तिघांविरुद्घ पोलिसांनी प्राचीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक शोषण करणे, लग्नात हुंडा दिला नाही, दागिने आणले नाही तसेच पगार देत नसल्यामुळे सतत टोमणे मारुन अपमानास्पद वागणुक देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.