गांजा तस्करीतून खरेदी केलेल्या प्रॉपटीवर एनसीबीची कारवाई
मुख्य आरोपीची 2.36 कोटी रुपयांची प्रॉपटी जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 सप्टेंबर 2025
मुंबई, – गांजा तस्करीतून खरेदी केलेल्या प्रॉपटीवर ंजप्तीची नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी कारवाई केली. याच गुन्ह्यांतील एका मुख्य आरोपीची 2 कोटी 36 लाखांची प्रॉपटी जप्त करण्यात आली आहे. त्यात आरोपीच्या तीन बँक खातीसह एक महागड्यासह कार आणि पुण्यातील भूखंडाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीतून मोठ्या प्रमाणात प्रॉपटी घेणार्या आरोपींमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
आंधप्रदेशातील ओडिशा शहरातून मोठ्या प्रमाणात गांजा आणून मुंबईसह इतर शहरात विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीची माहिती मुंबई एनसीबीच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर जून महिन्यांत अहिल्यानगर, पाथर्डी रोड परिसरात या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत या अधिकार्यांनी गांजा तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या पाचजणांच्या एका टोळीला अटक केली होती. त्यांच्याकडून 111 किलो गांजाचा साठा जप्त केला होता. या आरोपींमध्ये पुण्यात वास्तव्यास असलेल्या या टोळीच्या म्होरक्याचा समावेश आहे. त्याच्याच आदेशावरुन त्याचे काही सहकारी ओडिशाहून गांजा आणून त्याची मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरात गांजाची विक्री करत होते.
याच गांजा तस्करीतून या मुख्य आरोपीने मोठ्या प्रमाणात जंगम आणि स्थावर प्रॉपटी जमा केली होती. तपासादरम्यान ही माहिती उघडकीस आल्यानंतर त्याची प्रॉपटी जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तपासात या आरोपीचे विविध बँकेत तीन खाती असून त्यात गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे उघडकीस आले होते. या तिन्ही बँक खात्यावर टाच आणण्यात आली. तसेच त्याची एक महागडी महिंद्रा धार कार आणि पुण्यातील उसळी कांचन येथील भूखंड असा 2 कोटी 36 लाख रुपयांची प्रॉपटी या अधिकार्यांनी जप्त केली आहे. ही प्रॉपटी तस्कर आणि परकीय चलन हाताळणारे कायदा अणि नारकोटीक्स ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रॉपिक बसस्टन कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे.