मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – पैशांच्या अपहारासह लैगिंक छळवणूकीच्या गुन्ह्यांतील अर्जदार महिलेच्या वतीने तक्रारदार आरोपीकडे लाचेची मागणी एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. नऊ लाख नव्वद लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सरवदे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा झाल्याने गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
तक्रारदार ३६ वर्षांचे असून त्यांच्याविरुद्ध अलीकडेच एका महिलेने पैशांच्या अपहारासह लैगिंक छळवणूकप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सलवदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. याच संदर्भात तक्रारदाराला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. या महिला अर्जदाराचा जबाब नोंद न करता, तिची तक्रार दप्तरी दाखल करण्यासाठी अर्जदार महिलेला ९ लाख ९० हजार रुपये द्यावे असे सांगून चंद्रकांत सलवदे यांनी तक्रारदारांना लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सरवदे यांच्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याची २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी शहानिशा करण्यात आली होती. यावेळी अर्जदार महिलेच्या वतीने त्यांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. या लाचेच्या रक्कमेमुळे अर्जदार महिलेच अवाजवी फायदा होणार होता. त्यामुळे लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंद्रकांत सलवदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्यांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.