झोपडी हस्तांतर फाईल क्लिअरसाठी लाचेची मागणी

साठ हजाराची हजाराची लाचप्रकरणी तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – झोपडी हस्तांतर फाईल क्लिअर करण्यासाठी सहा लाख साठ हजाराच्या लाचेची मागणी करुन लाचेचा साठ हजाराचा पहिला हप्ता घेताना तिघांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दिनेश श्रीधर श्रेष्ठ, संजय मणिलाल त्रिवेदी आणि राजकुमार हिरालाल यादव अशी या तिघांची नावे आहेत. यातील दिनेश हे म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, संजय खाजगी कॉन्ट्रक्टर तर राजकुमार रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनाही गुरुवारी विशेष कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदारांचे एक झोपडे असून ही झोपडी त्यांना त्यांच्या काकांनी गिफ्ट डिड दिली होती. त्यानंतर ही झोपडी त्यांच्यावर नावावर झाली होती. या ठिकाणी एसआरएतर्ंगत पुर्नविकास होणार आहे. त्यासाठी त्यांनी बोरिवली विभागातील वांद्रे येथील भूव्यवस्थापक र्काालयात अभय योजनेतर्ंगत झोपडी हस्तांतर करण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांच्यासोबत इतर दहाजणांनी त्यांच्या झोपड्या हस्तांतर करण्यासाठी अर्ज केला होता. या सर्वांच्या वतीने ते स्वत सतत पाठपुरावा करत होते. या कामासंदर्भात त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी प्रलंबित कामासाठी प्रत्येकी साठ हजार म्हणजे अकराजणांच्या झोपड्या हस्तांतर करण्यासाठी सहा लाख साठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्यांची फाईल पास होणार नव्हती हे तक्रारदारांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी इच्छा नसतानाही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी त्यांच्याविरुद्ध मंगळवार ४ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्‍यांनी शहानिशा केली असता दिनेश श्रेष्ठ यांनी लाचेची मागणी करुन कामाचा पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपयांचा आगाऊ हप्ता आणण्यास सांगितले होते. तसेच ही रक्कम खाजगी कॉन्ट्रक्टर संजय त्रिवेदी यांना देण्यास सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे बुधवारी तक्रारदार लाचेचा साठ हजा रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी म्हाडा कार्यालयात आले होते. यावेळी लाचेची रक्कम संजय त्रिवेदी याने स्विकारुन रिक्षाचालक असलेल्या राजकुमार यादवला दिली होती. त्यानंतर या दोघांनाही या अधिकार्‍यांनी लाचेच्या रक्कमेसह अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांनी दिनेश श्रेष्ठ यांच्या वतीने ही लाच घेतल्याची कबुली दिली होती. त्यानंतर म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही गुरुवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. म्हाडाच्या कार्यकारी अभियंतासह तिघांना लाचप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त समजताच म्हाडा अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page