बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पोलीस शिपाईविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञात उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पोलीस शिपाई सुयश शरद कांबळे याच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुयशवर ज्ञात उत्पनापेक्षा अधिक संपत्ती केल्याचा आरोप असून ही संपत्ती 175 टक्के अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याची संबंधित अधिकार्यांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सुयश कांबळे हा पोलीस शिपाई असून सध्या मरोळ ल विभाग-चार सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. 1 जानेवारी ते 16 मे 2024 या कालावधीत सशस्त्र पोलीस दलात कार्यरत कारकून मदतनीस म्हणून असताना त्याने अन्य पोलीस कर्मचार्यांची ड्यूटी वाटप करताना मोठ्या प्रमाणात भष्ट्र आणि गैरकायदेशीर मार्गाने पैशांची मागणी केली. या पोलीस कर्मचार्याकडून पैसे स्विकारले होते. याबाबत काही तक्रारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्राप्त झाले होते. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. ही चौकशी सुरु असताना सुयश कांबळे याच्याकडे 5 लाख 27 हजार 345 रुपये बेहिशोबी सापडले होते.
ही रक्कम त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा 175 टक्के अधिक आहे. त्यांनी भष्ट्र आणि गैरमार्गाने बेहिशोबी मालमत्ता केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिता दिघे यांच तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध 13 (1), (ब), 13 (2) भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद सावंत, पोलीस निरीक्षक सुनिता दिघे हे करत आहेत.
दरम्यान त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांच्यासह 9881128129, 839093973, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरपोचखाना रोड, वरळी येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.