मुंबई विद्यापिठाच्या वरिष्ठ लिपिकाला दहा हजाराची लाच घेताना अटक

55 हजाराची मागणी करुन आधी पंधरा हजार रुपये घेतल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – बी कॉम पदवीचे अंतिम वर्षांतील परिक्षा निकालाचे मार्कलिस्ट देण्यासाठी दहा हजाराची लाच घेणार्‍या मुंबई विद्यापिठाच्या वरिष्ठ लिपिका निकिता विजय राठोड हिला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मार्कलिस्ट देण्यासाठी निकिताने 55 हजाराची मागणी केली होती, त्यासाठी आधी पंधरा हजार रुपये घेतले, मात्र आणखीन पैशांसाठी तिने तगादा लावल्यानंतर तक्रारदाराने तिच्याविरुद्ध तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार मुंबई विद्यापिठाचे विद्यार्थी असून त्यांनी अलीकडेच बी कॉम पदवीची परिक्षा दिली होती. अंतिम परिक्षा निकालाचे मार्कलिस्ट देण्यासाठी त्याने मुंबई विद्याविठाच्या छत्रपती शिवाजी महाराज भवन, निकाल कक्षेत अर्ज केला होता. यावेळी या कक्षेच्या वरिष्ठ लिपिक निकिता राठोड हिने त्यांच्याकडे 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 18 नोव्हेंबरला त्यांनी तिला पंधरा हजाराची लाच दिली होती. तरीही निकिताकडून आणखीन पैशांची मागणी होत होती.

10 डिसेंबरला मार्कलिस्टसंदर्भात भेट घेतल्यानंतर निकिताने उर्वरित रक्कमेबाबत तडतोड करुन आणखीन पंधरा हजार रुपयांची मागणी करुन मार्कलिस्ट देण्याचे आश्वासन दिले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्योनत त्यांनी त्याच दिवशी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची नंतर शहानिशा करण्यात आली होती. यावेळी निकिताने बी कॉम पदवीचे अंतिम वर्षांतील निकालाचे मार्कलिस्ट देण्यासाठी पंधरा हजाराची मागणी करुन दहा हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली होती.

त्यानंतर या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावून दहा हजाराची लाच घेताना निकिता राठोड हिला रंगेहाथ पकडले. तिच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त हरिदास किल्लेदार, पोलीस निरीक्षक रेखा काळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page