आयसिसच्या स्लीपर सेलच्या वॉण्टेड दहशतवाद्यांना अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मे 2025
मुंबई, – आयसिसच्या स्लीपर सेलच्या दोन वॉण्टेड संशयित दशहतवाद्यांना अखेर दोन वर्षांनी अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले आहे. जकार्ता येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय आलेल्या अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांवर पुण्यातील आयईडी बनविण्याची तसेच त्याची चाचणी केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत ते दोघेही एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची दहा झाली असून यापूर्वी आठजणांना एनआरएने अटक केली होती. तेव्हापासून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात भाड्याने घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये आयसिसच्या स्लीपर सेलच्या काही संशयितांनी बॉम्ब बनविण्याचा आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात अब्दुल्ला आणि तल्हा या दोघांसह त्यांच्या इतर सहकार्यांनी भाग घेतला होता. त्यांनी बनविलेल्या आईडीची चाचणी घेण्याासठी नियंत्रित स्फोट घडविण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविणत आला होता. याप्रकरणी संबंधित स्लीपर सेलच्या दहशतवाद्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली असून ते सर्वजण गेल्या दोन वर्षापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकि, अब्दुल कादीर पठाण, सिमब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकिक नाचन आणि शहानवाज आलम यांचा समावेश होता. या आठजणांविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात अब्दुल्ला शेख आणि तल्हा खान यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते.
या अटकेनंतर ते दोघेही विदेशात पळून गेले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते विदेशात वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एनआयएच्या विशेष न्यायालयाने आजमिनपात्र वॉरंट जारी केले होते. ते विदेशात पळून गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध नंतर लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच त्यांच्या अटकेसाठी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. शनिवाारी अब्दुल्ला शेख आणि तल्हा खान हे दोघेही जकार्ता येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. ही माहिती प्राप्त होताच या पथकाने विमानतळावरुन या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ते दोघेही आयसिसच्या स्लीपर सेलचे सदस्य आहेत. त्यांच्यावर आयसिसने भारतात हिंसाचार आणि दहशतीद्वारे इस्लामिक राज्य स्थापित करण्याचा अजेंडाला पुढे नेण्यासाठी युद्ध पुकारण्याचे मिशन सोपविण्यात आले होते. त्यांनी भारताची शांतता आणि सांप्रदायिक सोहार्द बिघडविण्याचा उद्देशाने दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचला होता.
दोन वर्षापूर्वी ते दोघेही त्यांच्या इतर सहकार्यासोबत पुण्यातील कोंढवा येथील अब्दुल्ला फैय्याज शेख याच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. मात्र एनआयएला त्यांच्या दहशतवादी कृत्याचा सुगावा लागताच ते पुण्यातून पळून गेले होते. त्यानंतर ते दोघेही विदेशात गेले आणि दोन वर्षांनी पुन्हा भारतात आले होते, मात्र मुंबई विमानतळावर उतरताच त्यांना एनआयएच्या अधिकार्यांनी अटक केली. जुलै 2023 रोजी बाईक चोरीच्या गुन्ह्यांत युनूस साकि आणि इम्रान खान या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्या अटकेनंतर आयसिसचा हा संपूर्ण कट उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांच्या इतर सहा सहकार्यांना एनआयएने अटक केली होती. अटकेत असलेले अब्दुल्ला शेख आणि तल्हा खान हे सध्या एनआयए कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या कटात सहभागी होण्यापूर्वी, विदेशात पळून जाण्यामागे तसेच मुंबईत परत येण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, याकामी त्यांना इतर कोणी मदत केली, त्यांना आर्थिक मदत कोणी केली याचा आता तपास सुरु आहे.