मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – भारतात बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया या आयसीस संघटनेशी संबंधित एका संशयित इंजिनिअर तरुणाला मुंबई एटीएसच्या अधिकार्यांनी अटक केली. अयान शेख असे या तरुणाचे नाव असून इंजिनिअरच्या वर्गात शिकत आहे. याच गुन्ह्यांत इतर दोन तरुणांची चौकशी सुरु असून चौकशीनंतर त्यांच्यावरही अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अयानवर आयसिस संघटनेसाठी ऑनलाईन प्रचार साहित्य शेअर केल्याचा आरोप आहे.
भारतात इस्लामिक स्टेट ऑफ इराक सिरिया या आयसीस संघटनेवर बंदी आहेत. तरीही या संघटनेसाठी मुंबईसह पुणे आणि इतर शहरात अनेक तरुण काम करत असल्याची माहिती प्राप्त होताच मुंबई एटीएसच्या पथकाने कुर्ला आणि गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात अचानक छापे टाकले होते. तीन फ्लॅटमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी साठा जप्त केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तीन तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात अयान शेख या तरुणाचा समावेश होता. त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे करण्यात यश आले आहे.
जप्त साहित्यांमध्ये पोलिसांना एक डिजीटल रोडमॅप सापडला असून ही माहिती त्याने आयसिय संघटनेच्या काही संशयितांना पुरविल्याचा आरोप आहे. अयान हा सोशल मिडीयासह एन्क्रिप्टेड मेसेसिंज प्लॅटफॉर्ममध्ये सक्रिय असून त्याच्याच माध्यमातून तो भारतविरोधी कारवाया करणार्या काही संशयितांच्या संपर्कात आल्यासचे बोलले जाते. त्यामुळे तो एटीएसच्या रडारवर आला होता. तो सध्या इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्यात डिलीट केलेला सर्व माहितीसह चॅट काढण्याचे काम सुरु आहे. त्याने कथित दहशतवादी संघटनेसाठी ऑनलाईन प्रचार साहित्य शेअर केल्याचा आरोप आहे. दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी, संघटनेत मुस्लिम तरुणांना सामावून घेण्यासाठी त्याच्याकडून विशेष प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तरुणांच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे. संबंधित तरुण कोणत्याही दशहतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्षात सहभागी नव्हते. मात्र त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशीत अयानकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात एटीएसला यश आले होते. त्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. त्याला शुक्रवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.
तपासात तो जेईएम आणि आयसिसच्या काही दशहतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारासह लॉजिस्टिक मदतीची तसेच दहशतवाद्याच्या आर्थिक निधी चॅनेलची एटीएसकडून चौकशी सुरु आहे. त्याच्यासोबत ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणांचीही चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.