मुंबई पोलीस दलातील सोळा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
सचिन गुंजाळ गुन्हे शाखा तर दत्ता नलावडे परिमंडळ दहामध्ये
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – मुंबई पोलीस दलातील सोळा पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात इतर शहरातून मुंबई शहरात बदली झालेल्या तीन पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. परिमंडळ दहाचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांची गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची परिमंडळ दहामध्ये बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबइ्र पोलीस दलातील सोळा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते.
शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच बाबींचा विचार करुन या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यात मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ तीन, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ दहा, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ बारा, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांची अंमली पदार्थ विरोधी पथक, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची बंदर परिमंडळ, मंत्रालय सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत अशोकसिंग परदेशी यांची दक्षिण वाहतूक विभाग, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा एक, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम नारायण कर्हाड यांची सायबर विभाग, परिमंडळ दहाचे सचिन गुंजाळ यांची गुन्हे शाखा, साताराचे पोलीस अधिक्षक समीर अस्लम शेख यांची परिमंडळ सहा, अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची परिमंडळ सात, राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक राजतिलक रोशन यांची प्रकटीकरण, दक्षिण वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा तानाजी जेडगे यांची मंत्रालय सुरक्षा विभाग, परिमंडळ बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता अभिषेक पाटील यांची मुख्यालय एक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम भिमराव घुगे यांची संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी रुजू होऊन कार्यभार स्विकारल्याबाबत प्रमाणपत्र वरिष्ठ आस्थापना, कक्ष तीन येथे सादर करावे असे आदेश प्रशासकीय अधिकारी मंदाकिन सानप यांनी जारी केले आहेत.