संभाव्य घातपाताच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहर अलर्टवर

धार्मिकस्थळासह गर्दीच्या ठिकाणावरील बंदोबस्तात वाढ

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – संभाव्य घातपाताची इशारा गुप्तचर विभागाकडून देण्यात आल्यानंतर मुंबई शहर पुन्हा अलर्टवर आहे. आगामी येणार्‍या महत्त्वाच्या सणासह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहरातील पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. धार्मिकस्थळासह गर्दीच्या ठिकाणावरील बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. २९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील फ्री फ्लाईट झोनमधये उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणार्‍या वस्तू सोडणे, पंतग उडविणे, लेझर बिम प्रकाशित करणे, फुगे आणि पॅराग्लायडर्स उडविण्यास बंदी घालण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

आगामी काळात मुंबई शहरात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या माहितीनंतर मुंबई शहरातील पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि येणार्‍या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठांकडून सर्वत्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची सूचना दिली आहे. धार्मिक स्थळासह गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरातील धार्मिकस्थळे दशहतवादीच्या हिटलिस्टवर असल्याने सर्व धार्मिकस्थळावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गरज पडल्यास अशा ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन तेथील बंदोबस्ताचा आढावा घेण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे. या आदेशानंतर कॉफर्डमार्केटसह इतर ठिकाणाच्या काही धार्मिक स्थळावर मॉक ड्रिल घेण्यात आले होते. मुंबईतील सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांना त्यांच्या झोनमधील नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर देण्यास सांगण्यात आले. प्रत्येक वाहनांची तसेच संशयित व्यक्तींची चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. कुठल्याही संशयास्पद वस्तूला हात लावू नये, अशा वस्तूची माहिती पोलिसांना द्यावी. स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत येणार्‍या मंदिरातील प्रशासनाला त्यांच्या बंदोबस्तात अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शहरातील प्रमुख शासकीय-निमशासकीय इमारत, कार्यालय, रेल्वे स्थानके, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारे वस्तू, पतंग आदी हवाई क्षेत्रात आणि आसपासच्या परिसरात उडविण्यास बंदी घातली आहे. ही बंदी २९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लघंन करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी अलीकडेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची एक बैठक घेऊन बंदोबस्ताबाबत योग्य सूचना दिल्या आहेत. बंदोबस्तात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकिदच पोलिसांना देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page