मुंबईत अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्यावर भर
संवेदनशील-अतिसंवेदनशील परिसरात जादा बंदोबस्त तैनात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मे 2025
मुंबई, – भारतीय सेन्याकडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्यावर अधिक भर ठेवला होता. शहरातील संवेदनशील, अतिसंवेदनशील ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सिंदूर ऑपरेशननंतर देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये दशहतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका पाहता सर्वच पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पहलगाम दशहतवादी हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचे संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाकिस्तानासह तिथे आश्रयास असलेल्या दशहतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावा अशी जोरदार मागणी धरु लागली होती. त्याचा एक भाग म्हणून भारतीय सैन्यांनी मंगळवारी रात्री उशिरा सिंदूर ऑपरेशन हाती घेतले होते. त्यात विविध दशहतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त करण्यात आले, त्यात काही दहशतवाद्यांचा खातमा करण्यात यश आले असून दशहतवाद्याचे कंबरडे मोडले आहे. या ऑपरेशनमुळे देशभरात संभाव्य दशहतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबईसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हवाई मार्गाने हल्ला होण्याची शक्यता असल्याने गुप्तचर विभागाने काही प्रमुख शहरातील पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई शहरात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण देशात उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहरात जास्त खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरात जास्तीत जास्त गस्त, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
26/11 सारखा आत्मघाती हल्ला झाल्यास कशा प्रकारे खबरदारी घ्यावी यासाठी विशेष भर दिला जात आहे. शहरातील संवदेनशील अधिक गस्त घालण्याचे तसेच अतिसंवेदनशील परिसरात जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. वर्दळीच्या ठिकाणीही स्थानिक पोलिसांच्या मदतीने इतर यंत्रणेची मदत घेतली जात आहे. स्लीपर सेलची माहितीही काढण्याचे काम स्थानिक पोलिसांसह एटीएसला देण्यात आले आहे. संशयित प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केला. चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला सोडून देण्याचे आदेश जारी करण्यत आले.
दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या शासकीय, निमशासकीय कार्यालय, महत्त्वाचे धार्मिक स्थळे, विविध देशातील दूतावास कार्यालयातील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मुंबईकरांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मुंबई पोलिसांकडून संबंधित गोष्टींची शहानिशा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.