मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – नोव्हेंबर महिन्यांत होणार्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, निवडणुका शांततेत पार पडावेत यासाठी सर्वच पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करताना या काावधीत सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना आवश्यक कारणाशिवाय, वैद्यकीय रजा वगळून इतर कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही. तसा आदेश कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्रासह झारखंड राज्यात नोव्हेंबर महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान आणि नंतर लगेचच २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुक आयोगाने ही घोषणा करताना राज्यात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच शहर प्रमुखांना पोलीस महासंचालक कार्यालयातून सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. शहरात या कालावधीत कुठेही जातीय तणाव होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कालावधीत कोणत्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना आवश्यक कारणाशिवाय, वैद्यकीय रजा वगळून इतर कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही. सर्वच पोलिसांना रजा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सुट्टीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने कामावर रुजू व्हावे असे आदेश देण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या वतीने संबंधित आदेश जारी करण्यात आले आहे.