मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईबाहेर गेलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नवीन सरकारने घरवापसी केली. घरवापसी होताच ४४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नवीन ठिकाणी बदल्या करुन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नवीन गिफ्ट दिले आहे. काही पोलीस अधिकार्यांना त्यांच्या जुन्या जागी आणि काही पोलीस अधिकार्यांवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणुक आयोगाच्या आदेशावरुन पोलीस महासंचालक कार्यालयातून आयपीएस अधिकार्यांसह सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या काही पोलीस अधिकार्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. त्यात पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकार्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी मुंबईबाहेरुन आलेल्या नवीन पोलीस अधिकार्यांना मुंबई शहराची माहिती नसल्याने त्यांच्यावर पोलीस ठाण्याची जबाबदारी देताना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची चांगली दमछाक झाली होती.
निवडणुक प्रक्रिया संपताच नवीन सरकारने मुंबईबाहेर बदली झालेल्या सर्वच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पुन्हा मुुंबई शहरात घरवापसी केली होती. गेल्या काही दिवसांपासून संबंधित पोलीस अधिकारी नवीन पोस्टिंगच्या प्रतिक्षेत होते. अखेर सोमवारी त्यापैकी ४४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नवीन वर्षांत नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. त्यात काही अधिकार्यांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तर काही अधिकार्यांना इतरत्र पोस्टिंग देण्यात आली आहे. मात्र मिळालेल्या नवीन पोस्टिंगमध्ये या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबईत झालेली बदली आणि आता नवीन पोस्टिंगमुळे संबंधित अधिकार्यांकडून लवकरच त्यांच्या पदाचा पदभार स्विकारला जाणार आहे.
ज्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची पोस्टिंग दाखविण्यात आली आहे, त्यात संदीप बाबाजीराव विश्वासराव यांची कफ परेड पोलीस ठाणे, दिपक कृष्णा दळवी यांची आझाद मैदान पोलीस ठाणे, संतोष नारायण धनवटे यांची माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे, संजय तातोबा काटे यांची सर जे. जे मार्ग पोलीस ठाणे, बाळकृष्ण नारायण देशमुख यांची पायधुनी पोलीस ठाणे, नितीन शंकर तडाखे यांची एल. टी मार्ग पोलीस ठाणे, रविंद्र महादेव काटकर यांची वरळी पोलीस ठाणे, मनिष सुरेश श्रीधनकर यांची काळाचौकी पोलीस ठाणे, मनिषा अजित शिर्के यांची सायन पोलीस ठाणे, विलास वामनराव दातीर शिवाजी पार्क पोलीस ठाणे, सदानंद जानबा राणे यांची चेंबूर पोलीस ठाणे, शशिकांत वामन पवार यांची टिळकनगर पोलीस ठाणे, अजय रामदास जोशी यांची मुलुंड पोलीस ठाणे, धनंजय पंढरीनाथ सोनावणे यांची सहार पोलीस ठाणे, संजय सदाशिव मराठे यांची वांद्रे पोलीस ठाणे, सुनिल दत्ताराम जाधव यांची जुहू पोलीस ठाणे, राजेंद्र महादेव मचिंछर यांची डी. एन नगर पोलीस ठाणे, सागर जगन्नाथ शिवलकर यांची गोरेगाव पोलीस ठाणे, प्रमोद नामदेव भोवते यांची कुलाबा पोलीस ठाणे, निलेश सिताराम बागुल यांची मरिनड्राईव्ह पोलीस ठाणे, अरविंद प्रल्हाद चंदनशिवे यांची ना. म जोशी मार्ग पोलीस ठाणे, राजेश प्रभाकर केवळे यांची पंतनगर पोलीस ठाणे, मोहन गणपती पाटील यांची ओशिवरा पोलीस ठाणे, राजीव शिवाजीराव चव्हाण यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, चिमाजी जगन्नाथ आढाव यांची भायखळा पोलीस ठाणे, पंढरीनाथ झिपरु पाटील यांची कांजूरमार्ग पोलीस ठाणे, योगेश मारुती चव्हाण यांची बीकेसी पोलीस ठाणे, रविंद्र परमेश्वर अडाणे यांची कांदिवली पोलीस ठाणे, ज्योती धनश्याम बागुल भोपळे यांची चारकोप पोलीस ठाणे, रजनी व्यकंट साळुंखे यांची वाहतूक, प्रविण दत्ताराम राणे संरक्षण व सुरक्षा, जगदीश पांडुरंग देशमुखे यांची आर्थिक गुन्हे शाखा, जयवंत शाम शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखा, अजय भगवान क्षीरसागर यांची गुन्हे शाखा, मंजुषा नंदकुमार परब यांची वाहतूक विभाग, जयवंत पांडुरंग सकपाळ यांची वाहतूक विभाग, अशोक सुरगौंडा खोत यांची गुन्हे शाखा, सतिश दत्ताराम गायकवाड यांची संरक्षण व सुरक्षा, भागवत रामा गरांडे यांची आर्थिक गुन्हे शाखा, राजेश रुद्रमणी नंदीमठ यांची सशस्त्र पोलीस वरळी, रामप्यारे गोपीनाथ राजभर सशस्त्र पोलीस ताडदेव, प्रमोद बळीराम तावडे यांची वाहतूक आणि जितेंद्र नंदकुमार कांबळे यांची गुन्हे शाखेत बदली दाखविण्यात आली आहे.