मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – नागपाडा परिसरातील एका कुंटनखान्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा नागपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी लवकुश सुदामा शर्मा नावाच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून या सर्व महिलांना मेडीकलनंतर चेंबूरच्या नवजीवन महिला वसतिगृहात पाठविण्यात आले आहे. कुंटनखान्याचा मालक चॉंद मोहम्मद याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
गेल्या काही वर्षांत नागपाड्यातील बहुतांश कुंटनखान्यातील सेक्स रॅकेटचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन अनेक महिलांची सुटका केली होती. याच गुन्ह्यांत पोलिसांनी सेक्स रॅकेट चालविणार्या दलालासह चालक, मालकांवर अटकेची कारवाई केली होती. तरीही काही ठिकाणी महिलांना डांबून ठेवून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. ही माहिती काढताना नागपाड्यातील कामाठीपुरा, अकरावी गल्ली, बोरी चाळीतील तळमजल्यावर विविध आमिष दाखवून मुंबईत आणलेल्या महिलांना डांबून तिथे त्यांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात आहे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी नागपाडा पोलिसांच्य विशेष पथकाने गुरुवारी तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी लवकुश शर्मा या मॅनेजरला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवीसह पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या चारही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांची रवानगी चेंबूरच्या महिला सुधारगृहात करण्यात आली. कारवाईदरम्यान कुुंटनखान्याचा मालक चॉंद मोहम्मद हा पळून गेला होता, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.