नंदीग्राम एक्सप्रेस ५० वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या

आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही; एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका ५० वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब साबळे असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपरचा रहिवाशी आहे. या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान सकाळी उघडकीस आलेल्या या आत्महत्येच्या घटनेने इतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता दादर रेल्वे स्थाकनात नंदीग्राम एक्सप्रेस आली होती. प्रवाशी उतरल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एक्सप्रेसची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना एका डब्ब्यातील शौचालयाचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना एका व्यक्तीने गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढल्यानंतर तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच दादर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रावरुन मृत व्यक्तीची ओळख पटली होती. बाबासाहेब साबळे असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथे राहत होता. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. तो कोठून आला होता याचा पोलीस तपास करत आहे. लवकरच त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page