सोासायटीच्या धनादेशाचा गैरवापर करुन साडेबारा लाखांचा गंडा

मुलुंड येथील घटना; मुख्य आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जून २०२४
मुंबई, – सोसायटीच्या धनादेशाचा गैरवापर करुन सुमारे साडेबारा लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीच्या माजी अध्यक्षाच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी गंगाधर सिताराम चाळके या मुख्य आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर हा सोसायटीच्या हिशोब तपासनीसचा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदाशिव बाबूराव दाभाडे हे मुलुंडच्या नवघर परिसरात राहत असून ते कॉटन ग्रीन येथील एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत तर त्यांची पत्नी महानगरपालिकेतून निवृत्त झाल्या आहेत. पूर्वी दाभाडे कुटुंबिय मुलुंडचया ९० फिट रोड, केळकर कॉलेजसमोरील त्रिरत्नदिप सोसायटीमध्ये राहत होते. २००६ ते २०२२ पर्यंत ते सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर आठ पदाधिकारी आणि सभासद होते. त्यांच्या सोसायटीचे एका खाजगी बँकेत खाते आहे. सोसायटीच्या हिशोब तपासणीसाठी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी २०१९ ते २०२० या कालावधीत संदेश तुकाराम कदम याची याची नेमणूक केली होती. त्यासाठी त्याला दरमाह आठ हजार वेतन दिले जात होते. याकामात त्याला गंगाधर हा मदतनीस म्हणून काम करत होता. जुलै २०१९ ते मे २०२४ या कालावधीत गंगाधरने सोसायटीच्या धनादेशावर अध्यक्ष, सचिन आणि खजिनदार यांची बोगस स्वाक्षरी करुन बँक खात्यातून साडेचौदा लाख रुपयांचा अपहार करुन सोसायटीची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संदेश कदमकडे विचारणा केली होती. मात्र त्याला काहीच माहिती नव्हती.

गंगाधरची चौकशी केली असता त्यानेच बोगस स्वाक्षरी करुन सोसायटीच्या साडेचौदा लाखांचा अपहार करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्याने ही रक्कम सोसायटीला परत करण्याचे आश्‍वासन दिले, त्यापैकी दोन लाख रुपये त्याने बँक खात्यात जमा केले होते. मात्र उर्वरित साडेबारा लाख रुपये न देता सोसायटीची फसवणुक केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तकारदारांनी नवघर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर गंगाधरविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि अन्य भादव कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगणयात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page