मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – लंडन व्हाया मुंबई सुरु असलेल्या कॅप्सूल आणि सिगरेट तस्करीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिट ने पर्दाफाश केला. एनसीबीने एअर कार्गो टर्मिनस येथे कारवाई करून ७५ लाख रुपये किमतीच्या कँप्सूल आणि सिगरेट जप्त केल्या आहे. एनसीबीला काही महत्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. लवकरच एनसीबी दोन कुरिअर कंपनी आणि लॉजिस्टिक कंपनीची चौकशी करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एनसीबीने तस्करांना दणका दिल्याने तस्कर चांगलचं हादरले आहेत.

शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी एनसीबीने घेतली आहे. गत वर्षी एनसीबीने शहरात विविध ठिकाणी कारवाई करून ड्रग तस्करांच्या नांग्या ठेवल्या होत्या. एनसीबी मुंबई युनिटला लंडन व्हाया मुंबई सुरु असलेल्या रॅकेटची माहिती मिळाली. या रॅकेट मधल्या सिंडिकेटचे काही तस्कर हे अवैधरित्या देशातून औषध तस्करी मध्ये गुंतले आहेत. एअर कार्गोच्या माध्यमातून लंडनला काही माल जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानंतर एनसीबी मुंबई युनिट चे अधिकारी हे एअर कार्गो टर्मिनस येथे गेले. तेथे सापळा रचून दोन कंटेनर थांबवले. त्या कंटेनरची तपासणी केली.
त्या कंटेनर मधून त्यात ७४ हजार कॅप्सूल आणि २ लाख ४ हजार सिगारेट्स जप्त केल्या. जप्त केलेले साहित्य हे खाद्यपदार्थ असलेल्या पिशव्या मध्ये लपवून ठेवले होते. दोन्ही डब्याचे मॅनिफेस्ट तपासले असता त्यात खाद्य पदार्थ असल्याचे पडताळणी मध्ये समोर आले.एनसीबीने जप्त केलेल्या सिगारेट्स या सीमा शुल्क विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. कॅप्सूल आणि सिगारेट्स तस्करी प्रकरणी दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्याची चौकशी केली जात आहेत.