गहाळ झालेले बारा लाखांचे मोबाईल तक्रारदारांना परत

नेरुळ पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – गहाळ झालेले सुमारे बारा लाखांचे 83 मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहे. गहाळ झालेले मोबाईल सापडल्याने तक्रादारांनी नेरुळ पोलिसांचे आभार व्यक्त केले तर या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांत नवी मुुंबईतील नेरुळ परिसरातून मोबाईल चोरीसह गहाळ होण्याच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत नेरुळ पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, सहपोलीस आयुक्त संजय येणपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक पंकज धाडगे, संजय लाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मयुर पवार, पोलीस हवालदार बाबाजी थोरात यांनी चोरीसह गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध सुरु केला होता.

मुंबईसह देशभरात विविध शहरातून पोलिसांनी काही दिवसांत 83 मोबाईल हस्तगत केले होते. त्याची किंमत बारा लाख दहा हजार रुपये होती. अलीकडेच एका कार्यक्रमांत चोरीसह गहाळ झालेले 83 मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी चार वाजता नेरुळ पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम आयोजित करणयात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करताना नेरुळ पोलिसांचे आभार व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page