122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी सीईओला अटक
हितेश-धर्मेशच्या पोलीस कोठडीत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्य सुमारे 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी अन्य एका आरोपीस गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्याीं अटक केली. अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन असे या आरोपीचे नाव असून तो बँकेचा माजी सीईओ आहे. या संपूर्ण घोटाळ्याची माहिती असताना त्याने कटातील मुख्य आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत अटकेत असलेले बँकेचे महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता आणि विकासक धर्मेश जयंतीलाल पौन यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांनाही शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर करणयत आले होते. यावेळी या दोघांच्या कोठडीत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हितेश मेहता याच्या कार्यालयातून पोलिसांनी 2 लाख 8 हजार 340 रुपयांची कॅश जप्त केली आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी 15 फेब्रुवारीला हितेशला त्याच्या दहिसर येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात त्यानेच हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी 70 कोटी 50 लाखांची कॅश त्याने धर्मेशला मे ते डिसेंबर 2024 तर डिसेंबर 2025 या कालावधीत दिली होती. या गुन्ह्यांत धर्मेशचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांच्या चौकशीनंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत होते. त्यांच्या चौकशीनंतर बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन याची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविली होती. त्यात अभिमन्यूला या संपूर्ण कटाची माहिती होती. ही माहिती लपवून त्याने हितेशला मदत केल्याचे उघडकीस आले होते. त्याला हितेशकडून एक कोटी रुपये मिळाले होते. चौकशीत अभिमन्यूने हितेश आणि धर्मेश यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
दुसरीकडे याच गुन्ह्यांतील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने हितेश आणि धर्मेश यांनाही हजर करण्यात आले होते. त्यांच्या पोलीस कोठडीत शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हितेशच्या कार्यालयातून पोलिसांनी सुमारे दोन लाखांची कॅश आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. या लॅपटॉपची पाहणी केल्यानंतर हितेशने त्याच्याकडे कामाला असलेल्या कर्मचारी वर्ग, बँकेतील अधिकार्यामार्फत बारा कोटी प्राप्त केल्याचे उघडकीस आले आहे.