न्यू इंडिया बँक घोटाळ्यात पती-पत्नीला फरार आरोपी घोषित

आरोपींची 21 ठिकाणाची 168 कोटीची प्रॉपटी जप्त करणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी अखेर बँकेचे अध्यक्ष हिरेन भानू आणि उपाध्याक्ष गौरी हिरेन भानू यांना विशेष सेशन कोर्टाने फरार आरोपी म्हणून घोषित केले आहेत. ते दोघेही पती-पत्नी असून गुन्हा दाखल होताच ते दोघेही विदेशात पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी आता आर्थिक गुन्हे शाखेने रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहेत. दुसरीकडे भारतीय न्याय सहिताच्या नवीन कलमांतर्गत आरोपींची प्रॉपटी जप्त करण्याच कायद्यात तरतूद असल्याने पाच आरोपींच्या 21 ठिकाणी असलेली सुमारे 168 कोटीची प्रॉपटी जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहेत. त्यात धर्मेश पौन याच्या कांदिवलीतील एसआरए प्रोजेक्टच्या 150 कोटीच्या प्रॉपटीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवीन कायद्यांतर्गत एखाद्या गुन्ह्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच 15 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, 16 फेब्रुवारीला विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, 20 फेब्रुवारीला बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, 27 फेब्रुवारीला मनोहर अरुणाचलम मारुतुवार, 15 मार्चला शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल कल्याणजी देढिया, 16 मार्चला उल्हानाथन अरुणाचलम मारुतुवार ऊर्फ अरुणभाई आणि 17 मार्चला व्यावसायिक जावेद इक्बाल आजम मोहम्मद फारुख आजम, 22 मार्चला झारखंडचा हॉटेल व्यावसायिक राजीवरंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता अशा आठजणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत आठही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

याच गुन्ह्यांत हिरेन भानू हा 26 जानेवारीला तर त्याची पत्नी गौरी भानू 10 फेब्रुवारीला विदेशात पळून गेले होते. ते दोघेही बँकेत अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्याक्ष पदावर कामावर होते. त्यांनीच हितेश मेहतासह इतर आरोपींच्या मदतीने बँकेत हा आर्थिक घोटाळा केला होता. त्यामुळे या गुन्ह्यांत या दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. ते दोघेही विदेशात पळून गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यातआले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. आता या दोघांनाही कोर्टाने फरारी आरोपी म्हणून घोषित केले आहेत.

दुसरीकडे या कथित घोटाळ्याप्रकरणी पाचही आरोपींच्या एकवीस ठिकाणी असलेल्या प्रॉपटीवर जप्तीची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. त्यासाठी विशेष कोर्टात अर्ज करण्यात आली होता. कोर्टाने परवानगीनंतर आता या पाचही आरोपींच्या प्रॉपटी जप्तीची कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यात धर्मेश पौन यांच्या विकसित केलेल्या चारकोप येथील 150 कोटीच्या एसआरए प्रोजेक्टचा समावेश आहे. हितेश मेहताच्या सात फ्लॅट, एक बंगला आणि व्यावसायिक गाळा, आरोपी उल्हानाथनच्या दुकान, कपिलच्या मालकीच्या फ्लॅट आणि शॉप, मधुबनीच्य दुकान आणि फ्लॅट, पटनाच्या फ्लॅट आदींचा समावेश आहे. जवळपास 21 ठिकाणी 168 कोटीची ही प्रॉपटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय नागरिक सुरक्षा सहिता कायद्याच्या 107 कलमांतर्गत अशा प्रकारची प्रॉपटी जप्तीची ही पहिलीच कारवाई असेल असे एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या आरोपींना चांगलाच धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page