मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – प्रेमसंबंध उघड करुन बदनामीची धमकी देऊन एका अठरा वर्षांच्या तरुणीवर तिच्याच चुलत मामाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस ाअली आहे. याप्रकरणी आरोपी मामाविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत तरुणी ही वांद्रे येथे राहत असून आरोपी हा तिच्या आईचा चुलत मामा आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या मामाला समजली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत ती अल्पवयीन असताना त्याने तिच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या कुटुंबियांना सांगून त्यांच्यातील अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर तिला ब्लेटने बेदम मारहाण केली होती. तिचे प्रेमसंबंध उघड न करण्यासाठी तसेच त्यांच्यातील फोटो व्हायरल न करण्यासाठी त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
ऑगस्ट महिन्यांत तिच्या घरी कोणीही नव्हते. यावेळी तिचा मामाने तिचे फोटो व्हायरल न करण्यासाठी तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता. तसेच तो तिला सतत व्हॉटअप कॉल करुन त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. त्यातून ही तरुणी गरोदर राहिली होती. चुलत मामाकडून होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून तिने हा प्रकार निर्मलनगर पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह मारहाण करणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.