मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुबई, – ऑनलाईन पोर्टलवरून खरेदी विक्री करताय सावधान ! खरेदी विक्रीच्या नावाखाली ठगाने फसवणूक केल्याच्या तीन घटना शहरात घडल्या आहेत. या प्रकरणी मलबार हिल, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे आणि घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
पहिली घटना घाटकोपर येथे घडली. घाटकोपर येथे राहणारी महिला गृहिणी आहे. गेल्या महिन्यात त्याने ऑनलाईन साईडवरून बरण्या आणि चपात्या ठेवण्यासाठी डब्याची ऑर्डर केली होती. २७ नोव्हेंबर ला डिलिव्हरी बॉय साहित्य घेऊन त्याच्याकडे आला. त्यानंतर महिलेने ते साहित्य उघडून बघितले. एक डबा फुटका असल्याने महिलेने एका अप्स मधील ऑप्शन उघडले. वस्तू खराब असल्याने त्या परत करण्यासाठी पर्याय निवडला. तेव्हा महिलेला ती रक्कम ऑनलाईन पाठवायची कि ऑफ लाईन पाठवायची अशी विचारणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनीचा डिलिव्हरी बॉय घरी आला. त्याने ते साहित्य घेतले. काही वेळाने त्याना बँकेत ४१९ रुपये जमा झालायचा त्याना मेसेज आला. ६ डिसेंबरला एका नंबरवरून महिलेला फोन आला. फोन करणाऱ्याने तिच्याकडे साहित्याची माहिती विचारून एपिके फाईल पाठवली. त्या फाईल मध्ये महिलेला तिची माहिती भरण्यास सांगितले. माहिती भरता येत नसल्याचे महिलेने त्याला सांगितले. काही वेळाने ठगाने तिला पुन्हा फोन करून माहिती कशी भरायची हे सांगितले. १४ डिसेंबरला महिलेच्या पतीने तिचा मोबाईल तपासला. तेव्हा तिच्या खात्यातून पैसे गेल्याचे त्याच्या लक्षात आले. ठगाने तिच्या खात्यातून २ लाख ७६ हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दुसरी घटना दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे घडली. सध्या ऑनलाईन पोर्टल वर मोबाईल साहित्य बाबत खूप जाहिरात बाजी केली जाते. काळबादेवी येथे राहणारे तक्रारदार हे दोहा विमानतळावर मॅकेनिक म्हणून काम करतात. सप्टेंबर महिन्यात त्याने ऑनलाईनवरून एअरफोन मागवले होते. मात्र एअर फोन न मिळाल्याने त्याने त्या कंपनीला ईमेल केला. त्या ईमेलला काहीच उत्तर न आल्याने त्याने ऑनलाईन वर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. एका नंबरवर त्याने फोन केला. काही वेळाने त्याना फोन आला. तेव्हा त्याने एअर फोन बाबत तक्रार केली. ठगाने त्याना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरल्यानंतर त्याच्या खात्यातून १ लाख ७५ हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
तिसरी घटना मलबार हिल परिसरात घडली. वृद्ध महिला ही तिच्या पती सोबत मलबार हिल येथे राहते. दोन दिवसापूर्वी त्याने त्याच्या घरातील फर्निचर विक्रीची जाहिरात ऑनलाईन पोर्टलवर टाकली होती. त्यानंतर महिलेला एका नंबरवरून फोन आला. त्याने तो फर्निचर घेत असल्याचे महिलेच्या पतीला भासवले. ठगाने त्याच्या इ वॉलेटच्या क्यु आर कोडची माहिती घेतली. ऑनलाईन पैसे मिळतील अशा त्याने भूलथापा मारल्या. ठगाने महिलेला रक्कम भरण्याच्या नावाखाली गंडा घातला. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटला. त्यामुळे तिने सायबर हेलपाईन १९३० या हेल्पलाईनवर फोन केला. ३ लाख ७२ हजार रुपयाची फसवणूक प्रकरणी महिलेने मलबार हिल पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.