मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – झटपट श्रीमंत होण्यासाठी देण्यात येणार टास्क आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. ठगाने टास्क आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या तीन घटना मुंबईत घडल्या आहेत. या प्रकरणी बोरिवली, वर्सोवा आणि मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – झटपट श्रीमंत होण्यासाठी देण्यात येणार टास्क आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. ठगाने टास्क आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या तीन घटना मुंबईत घडल्या आहेत. या प्रकरणी बोरिवली, वर्सोवा आणि मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सायबर ठग हे फसवणुकीसाठी रोज नवनवीन आयडिया शोधून काढतात. पूर्वी लॉटरीच्या नावाखाली ठग हे फसवणूक करायचे. आता ठगाने गुगलवर रेटिंग टास्क आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. लॉक डाऊन नंतर अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्याचा फायदा ठगाने घेतला आहे. ठग हे नागरिकांना फोन करतात. फोन करून अर्धवेळ काम करून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न सायबर ठग दाखवून नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारतात. त्याना टेलिग्राम ग्रुप वर जोडले जाते. त्या मागील कारण देखील तसेच आहेत. टेलिग्राम वर एकदा माहिती डिलीट केल्यावर ती माहिती पुन्हा मिळते अशक्य असते. त्यामुळे ठग हे नागरिकांना टेलिग्राम ग्रुपवरच जोडून गंडा घालतात..लालच म्हणून ठग हे नागरिकांना सुरुवातीला १०० ते २००० हजार रुपये देतात. त्या लालचेपोटी नागरिक ठगावर विश्वास ठेऊन पैसे गुंतवतात.
नागरिक हे पैसे गुंतवतात हे स्पष्ट झाल्यावर ठग हे नागरिकांना आपल्या हनी ट्रॅप मध्ये घेऊन गंडा घालतात. बनावट अप्सवर भरपूर नफा झाल्याचे भासवतात, गुंतवलेली रक्कम परत हवी असल्यास अधिक पैशाची मागणी करतात. त्यानंतर टेलिग्रामवरून नागरिकांना ब्लॉक करून त्याची फसवणूक करतात अशी त्याची मोडस आहे. अशीच फसवणुकीची घटना बोरिवली येथे घडली आहे.तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. ठगाने त्याना मेसे पाठवला. घरात बसून पैसे कमवा असे सांगितले. गुगल मॅप वर हॉटेलला रेटिंग दिल्यास पैसे मिळतील असे त्याना सांगितले. त्यानंतर ठगाने त्याना एका टेलिग्राम ग्रुप मध्ये जोडले. त्याना ठगाने एक टास्क दिली. लालचे पोटी तक्रारदार याने ५. ७८ लाख रुपये गुंतवले. तिने नफा झालेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम निघत नव्हती. तेव्हा ठगाने तिला टेलिग्रामवर ब्लॉक केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
एकीकडे टास्कच्या नावाखाली फसवणूक सुरु असताना दुसरीकडे ईडी, सीबीआय, दिल्ली पोलीस, आरबीआय, सर्वोच न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ठग हे नागिरकांना अक्षरक्ष भीती दाखवून बँक खात्यातून पैसे काढून घेतात. केंद्रीय यंत्रणा तपास करत असल्याचे भासवतात. या केंद्रीय यंत्रणांमधील अधिकाऱ्याच्या नावाचा गैर वापर करतात. मनी लौंड्रीन्ग सारख्या गुन्ह्याचा हवाला देत कारवाई झाल्यास अटक होईल, तुरुंगात जावे लागेल असे सांगून नागरिकांना भीती दाखवतात. याचा एक भाग म्हणजे ठग हे खोटी चौकशी देखील करत असल्याचे भासवतात. रेकॉर्डेड व्हिडिओ प्ले करतात. तर कधी तोतया पोलीस हे गणवेशात बसून नागरिकांची चौकशी करतात. चौकशीच्या नावाखाली बँक खात्याची माहिती घेऊन डिजिटल अटक झाल्याचे भासवून नागरिकांना घरात बसण्यास भाग पडतात. तर कधी अटक होऊ नये म्हणून खात्यात पैसे जमा करण्यास सांगून फसवणूक करतात. फसवणुकीची रक्कम ही विविध बँक खात्यात जमा होत असते. ती बँक खाती देखील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असतात. ठग हे बँक खात्यात जमा होणारी रक्कम ऑपरेटरला काढण्यास सांगून त्याच्या मोबदल्यात त्याना पैसे देतात.
डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईत दोन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. मालाड येथे राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. शनिवारी त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवले. एकाने तुमच्या नावाचे आधारकार्ड वापरून बँकेत खाते उघडले आहे. ज्यामध्ये मनी लौंड्रीन्ग झाली आहे. मनी लौंड्रीन्ग झाल्याने तुम्हाला अटक करत आहेत, अशी भीती दाखवली. त्यानंतर ठगाने त्याना विडिओ कॉल केला. तेव्हा पोलिसांचा गणवेश घातलेला व्यक्ती बोलत होता. त्याने अटक न करण्यासाठी १० लाखांची मागणी केली. भीती पोटी तक्रारदार याने ८.६ लाख रुपये विविध खात्यात ट्रान्फर केले. सायंकाळी त्याची मुलगी घरी आली. तेव्हा त्याने घडल्या प्रकाराची माहिती मुलीला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
दुसरी घटना वर्सोवा येथे घडली. वर्सोवाच्या यारी रोड येथे तक्रारदार राहतात. त्याना नुकताच एका नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. दिल्ली मध्ये फसवणुकीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठगाने त्याना गुन्ह्याचा नंबर आणि कलम सांगितली. तसेच आधारकार्डचा वापर करून बँक खाते उघडल्याचे त्याना सांगितले. हे प्रकरण मनी लौंड्रीन्गचे असल्याने त्याचा तपास सीबीआय करत आहे. ठगाने तक्रारदार याना भीती दाखवली. चौकशीचा बहाणा करून डिजिटल अटक झाल्याचे सांगितले. कारवाईची भीती दाखवून ठगाने तक्रारदार यांच्याकडून सहा लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वर्सोवा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.