मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन चालणार्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अलमेलू ऊर्फ ज्योती नावाच्या एका दलाल महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 20 ते 25 वयोगटातील चार तरुणींची सुटका केली आहे. या चारही तरुणींना मेडीकलनंतर जोगेश्वरीतील वन स्टॉप सखी सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. अटक महिलेविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला विशेष कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अलमेलू ऊर्फ ज्योती ही अंबरनाथला राहत असून तिच्या संपर्कात काही तरुणींसह महिला होत्या. त्यांच्या मदतीने ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होती. तिला संपर्क साधल्यानंतर संबंधित तरुणींसह महिलांना ग्राहकांसोबत वेगवेगळ्या गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेलमध्ये शारीरिक संबंधासाठी पाठवत होती. अलमेलू ही ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती प्राप्त होताच त्याची वर्सोवा पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांच्या वतीने एका बोगस ग्राहकाने तिला संपर्क साधून तिच्याकडे तीन ते चार तरुणींची मागणी केली होती. यावेळी बोगस ग्राहकासोबत तिचे फोनवरुन सर्व आर्थिक व्यवहार झाला होता.
ठरल्याप्रमाणे ती चार तरुणीसोबत गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अंधेरीतील जे. पी रोडवरील एका हॉटेलमध्ये आली होती. यावेळी बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्यासह त्यांच्या पथकाने तिथे कारवाई केली होती. अलमेलूला ताब्यात घेतल्यानंतर चारही तरुणींची पोलिसांनी सुटका केली होती. त्यांच्या चौकशीतून त्या चौघीही तिच्या सांगण्यावरुन तिथे पुरुष ग्राहकासोबत शारीरिक संबंधासाठी आल्याचे सांगितले.
या ग्राहकाकडून मिळणार्या रक्कमेपैकी काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती. हा प्रकार उघडकीस येताच अलमेलूविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला शुक्रवारी विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या चारही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना वन स्टॉप सखी सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते.