ऑपरेशन बुलियान ब्लेझअंतर्गत सोने तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश
कोट्यवधी रुपयांच्या सोन्या-चांदीसह अकराजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरात तस्करीमार्गे आणलेले सोने वितळवून नंतर या सोन्याची होलसेलमध्ये विक्री करणार्या एका टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपी पिता-पूत्रासह अकराजणांना या अधिकार्यांनी अटक केली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे बार जप्त केले आहेत. अटक आरोपींमध्ये एस. एस जोशी, ए. एस केसरकर, व्ही व्ही कदम, पी. कुमार, एन. व्ही ठक्कर, एस. जोशी, एस नराळे, व्ही ठक्कर, व्ही. एच रबरी, एस. पी त्रिपाठी आणि एस. पी राठोड यांचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असून ते सोने वितळवून नंतर त्याची बाजारात विक्री करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआयआरच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी ऑपरेशन बुलियन ब्लेझ नावाचे एक ऑपरेशन हाती घेतले होते. या टोळीची माहिती काढत असताना या पथकाने सोमवारी 10 नोव्हेंबरला दक्षिण मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस कारवाई केली होती. त्यात दोन बेकायदेशीर सोने वितळविण्याचे युनिट आणि दोन नोंदणीकृत नसलेले शॉपच्या समावेश होता. दोन्ही युनिटमधील भट्ट्या पूर्णपणे कार्यरत असल्याचे दिसून आले.
तस्करीमार्गे आणलेले सोने तिथे आणले जात होते. त्यानंतर ते सोने वितळवून त्याचे सोन्याचे बार बनविले जात होते. या सोन्याची बारची नंतर बाजारात होलसेलमध्ये विक्री केली जात होती. घटनास्थळाहून या अधिकार्यांनी 6 किलो 350 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले होते. या सोन्याची नंतर विविध एजंट आणि डिलीव्हरीमार्फत विक्री होत होती. दुसरीकडे दुसर्या पथकाने दोन शॉपमध्ये केलेल्या कारवाईत आणखीन 5 किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले होते. या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी 15 कोटी 5 लाख रुपयांचे 11 किलो 880 ग्रॅम वजनाचे सोने आणि 8 किलो 720 ग्रॅम वजनाचे चांदी जप्त केले आहेत.
सोन्याची तस्करी, सोने वितळवणे, सोन्याची बेकायदेशीर विक्री करणे या गुन्ह्यांत काही आरोपींची नावे समोर आले होते. त्यानंतर या युनिटने वेगवेगळ्या परिसरातून अकराजणांना अटक केली. त्यात टोळीच्या मुख्य आरोपीसह त्याचे वडिल, मॅनेजर, तीन डिलीव्हरी बॉय, भट्टी व शॉपमधील काम करणारे कर्मचारी आणि अकाऊंट विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे. या कर्मचार्यांनी आतापर्यंत किती सोने आले, ते सोने वितळवून बाजारात किती सोन्याची विक्री केली याा हिशोब नोंद करुन ठेवला होता. ही नोंदवहीत या अधिकार्यांनी जप्त केली आहे.
प्राथमिक तपासात अशा प्रकारे सोन्याची तस्करी करणारी ही सराईत टोळी आहे. सोन्याची तस्करीसह विक्रीसाठी या टोळीने युनियोजित कट रचल्याचे दिसून आले. या टोळीने भारताच्या सोने आयात धारेणाचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे तसेच लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित अकराजणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होत. यावेळी कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.