मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका ३२ वर्षांच्या बँक अधिकारी तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडून घेतलेल्या सुमारे २५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुजरातच्या एका व्यावसायिकाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद राशिद इम्रान शेख असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद राशिदने केसिनोमध्ये सुमारे साठ लाख रुपये गमाविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३२ वर्षांची पिडीत तरुणी बँकर्स असून ती अंधेरी परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिची सोशल मिडीयावरुन आरोपी मोहम्मद राशिदशी ओळख झाली होती. तो जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्याची स्वतची कंपनी असल्याचे त्याने तिला सांगितले होते. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली होती. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर गेल्या चार वर्षांत अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. व्यवसायानिमित्त तिच्याकडून उसने २५ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिला तिचे पैसे परत केले नाही. गेल्या काही महिन्यांपासून ती त्याच्याकडे सतत लग्नाविषयी विचारणा करत होती. मात्र लग्नाचा विषय काढल्यानंतर तो तिच्याशी वाद घालत होता. तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता.
लग्नाच्या आमिषाने मोहम्मद राशिकने शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केला होता. तिच्याकडून घेतलेल्या २५ लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. केसिनोमध्ये तिच्या पैशांसह सुमारे ६० लाख रुपये गमाविल्याचे तिला नंतर समजले होते. त्याच्याकडून झालेल्या फसवणुकीनंतर तिने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. मोहम्मद राशिद हा मूळचा गुजरातचा रहिवाशी असून अंधेरीतील मिल्लतनगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायकलच्या बहाण्याने मुलीवर विनयभंगासह लैगिंक अत्याचार
दुसर्या घटनेत सायकल भेट देण्याचे आमिष दाखवून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्यावर तिच्याच परिचित ४५ वर्षांच्या व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सागर नावाच्या आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलगी मालवणी परिसरात राहत असून एक महिन्यांपूर्वीच तिची सागरशी एका सायकल दुकानात ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. यावेळी त्याने तिला भेट म्हणून सायकल देण्याचे आमिष दाखविले होते. १२ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीत त्याने तिला वेळोवेळी भेटायला बोलाविले होते. तिला आक्सा चौपाटीसह प्रवासादरम्यान रिक्षात तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार शुक्रवारी तिने तिच्या आईला सांगितला होता. या माहितीनंतर तिने मालवणी पोलिसांत सागर या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.