अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन मॉडेलच्या अंगावर कार घातली

अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील प्रकार सीसीटिव्ही कैद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन होणार्‍या वादाला कंटाळून एका तरुणाने त्याच्याच मॉडेल मैत्रिणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन तिच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीतील लोखंडवाला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोहम्मद शकील शेख या आरोपी मित्राविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या घटनेने तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

तक्रारदार तरुणी ही व्यवसायाने मॉडेल असून तिचा मोहम्मद शकील हा मित्र आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद होत होते. सोमवारी रात्री ती अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका निवासी इमारतीजवळ होती. यावेळी तिथे आरोपी मित्र त्याच्या स्कोडा कारने तिथे आला होता. त्याने तिच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपस्थित लोकांनी तिला वेळीच बाजूला केले.

या घटनेने तिला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर तो तेथून कारसोबत पळून गेला होता. ही माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मॉडेल तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद शकीलविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तिने तिच्या तक्रारीत आरोपी तिचा मित्र असून तो गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरवत होता. तिची बदनामीचा प्रयत्न करत होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते.

याच वादातून त्याने त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला होता. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page