दिडोंशी कोर्टातून आरोपीला नातेवाईकांकडे घेऊन गेला

आरोपीचे पलायन तर पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2026
मुंबई, – न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला सुनावणीसाठी आणल्यानंतर त्याला दिडोंशी कोर्टातून त्याच्या जोगेश्वरीतील नातेवाईकांसह वकिलांकडे नेण्याचा प्रताप ल विभागाच्या पोलीस शिपायाने केला, याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच आवेश तंजीम अहमद या आरोपीविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन करणे तसेच आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ल विभागाचा पोलीस शिपाई गहिनीनाथ काळे याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना शुक्रवारी 10 एप्रिलला दुपारी सव्वा ते साडेचारच्या सुमारास जोगेश्वरीतील पटेल इस्टेट रोड, लोधा बेलर रेसीडेन्सीमध्ये घडली. आवेश अहमद हा जोगेश्वरीचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध एका गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हा दाखल होताच त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. त्यामुळे त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी 10 एप्रिलला त्याची विशेष दिडोंशी कोर्टात सुनावणी होती. त्यामुळे त्याला जेलमधून कोर्टातून नेण्यात आले होते. यावेळी त्याच्यासोबत ल विभागाचा पोलीस शिपाई गहिनीनाथ काळे हा होता. त्याने त्याला दिडोंशी कोर्टात हजर आणण्यात आले होते.

दिडोंशी कोर्टातून तो त्याला घेऊन पटेल इस्टेट रोड, लोधा बेलर रेसीडेन्सी इमारतीजवळ आणले होते. तिथेच आरोपीचे नातेवाईक आणि वकिल उपस्थित होते. या सर्वांना भेटल्यांनतर तो तेथनू पळून गेला होता. साडेचार वाजता हा प्रकार गहिनीनाथ काळे याच्या लक्षात येताच त्याने ओशिवरा पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आवेदविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

तपासात गहिनीनाथ काळे हा त्याला कोर्टातून जोगेश्वरीतील नातेवाईकांना भेटण्यासाठी आणल्याचे उघडकीस आले होते. याच संधीचा फायदा घेऊन आवेद हा तेथून पळून गेला होता. त्यामुळे त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गहिनीनाथ काळे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलीस शिपाई गहिनीनाथ काळे याची पोलिसांनी विभागीय चौकशी केली आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच सेवेतून निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. दरम्यान आवेशच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page