अंधेरी येथे एअर गन गोळी लागून श्‍वान जखमी

अज्ञात व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – अंधेरी येथे एअर गनच्या हल्ल्यात एक श्‍वान जखमी झाला. त्याच्या शरीरात एक गोळी लागली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्रीच्या वेळेस हा श्‍वान भुंकत असल्याने त्याच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जाते.

गेल्या काही दिवसांपासून शहरात भटक्या श्‍वानांवर हलला होत असल्याचा घटना घडत आहे. अशीच एक घटना रविवारी सकाळी अंधेरीतील ओशिवरा परिसरात घडली. या परिसरातील एका निवासी सोसायटीम्ये गुल्फी नावाचा एक श्‍वान राहतो. तो अनोळखी व्यक्तीवर सतत भुंकतो, रात्रीच्या वेळेस त्याच्या भुंकण्याने अनेक रहिवाशांना त्रास होत होता. सकाळी काही तरुण परिसरात बसले होते. यावेळी त्यांना अचानक आवाज आला. त्यांनी आवाज आलेल्या ठिकाणी पाहणी केला असता तिथे त्यांना गुल्फी हा गंभीर अवस्थेत दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला जवळच्या पशु वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्याच्या शरीरात एक एअर गनची एक गोळी अडकली होती.

या घटनेची माहिती मिळताच श्‍वान प्रेमी संघटनांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकणी ओशिवरा पोलिसांत रितसर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही गोळी नेमकी कुठून आली याचा उलघडा होऊ शकला नाही. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीचा तपशील मात्र समजू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page