डॉक्टर महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग

58 वर्षांच्या डॉक्टरविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – परळ परिसरातील एका नामांकित शासकीय हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीचा तिच्याच सिनिअर डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 58 वर्षांच्या आरोपी डॉक्टरविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने अद्याप आरोपी डॉक्टरविरुद्ध अटकेची कारवाई झाली नाही. या गुन्ह्यांत त्याची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

39 वर्षांची तक्रारदार महिला ही डॉक्टर असून तिच्या पती आणि दोन मुलीसोबत परळ परिसरात राहते. ती तिच्या पतीसोबत एका नामांकित शासकीय हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. याच परिसरात 58 वर्षांचा आरोपी डॉक्टर राहत असून तो तिचा सिनिअर आहे. आरोपीसोबत तिचे पती संबंधित हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. अनेकदा आरोपी तिच्या पतीला शिवीगाळ करुन धमकी देत होता. त्याचा त्याच्याकडून सतत मानसिक शोषण सुरु होता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तक्रारदार महिलेशी अश्लील चाळे करुन तिच्या पाठीवर आणि पृष्ठभागावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता.

इतकेच नव्हे तर तिच्या पंधरा आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत त्याने अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला होता. हा संपूर्ण प्रकार 1 जानेवारी 2015 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीदरम्यान झाला होता. सुरुवातीला तिने बदनामीच्या भीतीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र आरोपी डॉक्टरांकडून सतत तिच्या पतीचा मानसिक शोषणासह तिच्यासह तिच्या दोन्ही मुलीचा विनयभंग झाल्यानंतर तिने हा प्रकार भोईवाडा पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी डॉक्टरविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचात तपास सुरु असून लवकरच आरोपीची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page