निवृत्त मेजर महिलेच्या घरी २६.८८ लाखांच्या मुद्देमालाची चोरी

मोलकरणीनेच प्रियकराच्या मदतीने चोरी केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – निवृत्त मेजर महिलेच्या घरी घरकाम करताना मोलकरणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पाच महिन्यांत २६ लाख ८८ लाख रुपयांच्या हिरेजडीत दागिने आणि कॅशवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच आरोपी मोलकरणीसह तिच्या प्रियकराला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. अमृता राजू इंगळे आणि संदीप पांडुरंग शेजवळ अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना विक्रोळीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी चोरीची कबुली दिल्याने त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सागितले.

शुकृती सुशीलकुमार शुक्ला या निवृत्त मेजर असून घाटकोपरच्या कल्पतरु औरा अपार्टमेंटमध्ये ती तिच्या वयोवृद्ध आई-वडिल आणि मुलासोबत राहतो. सध्या ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २ मे २०२४ रोजी अमृता इंगळे ही तिच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला लागली होती. तिच्या कामाच्या तिसर्‍या दिवशी तिला तिच्या कानातील पावणेसात लाख रुपयांचे हिरेजडीत रिंग गायब झाल्याचे दिसून आले. तिने घरात सर्वत्र इअर रिंगचा शोध घेतला, मात्र तिला कुठेच तिचे इअर रिंग सापडले नाही. त्यामुळे तिने अमृताला विचारणा केली असता तिने रिंगविषयी तिला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. ही रिंग घरात असण्याची शक्यता वर्तवून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यांत तिचे आणखीन काही हिरेजडीत दागिने घरातून गायब झाले होते. तिने दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला दागिने सापडले नाही. तिने पुन्हा अमृताकडे विचारणा केली होती, मात्र तिने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. १२ ऑक्टोंबरला शुकृती ही तिच्या वडिलांसोबत घरी होती. यावेळी तिच्या पर्समध्ये दहा हजार रुपये होते. दुपारी अमृता ही कामावर आली. त्यानंतर ती तिच्या कामाला लागली. काही वेळानंतर तिने पर्स पाहिली असता त्यात साडेचार हजार कमी होते. यापूर्वीही तिच्या घरातून अशाच प्रकारे काही कॅश चोरीस गेले होते. दुसर्‍या दिवशी तिने अमृताकडे पैशांविषयी विचारणा केली. पैसे काढले असतील तर खर सांग, मी कोणालाही काही सांगणार नाही किंवा तिची पोलिसांत तक्रार करणार नाही असे सांगितले. त्यानंतर तिने पर्समधून चार हजार चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर ती घरातून निघून गेली होती.

याच दरम्यान तिच्या कार्यालयातील कर्मचारी जयेश आचरेकर यांनी अमृताने त्यांच्या घरीही चोरी केल्याचे सांगितले. या घटनेनंतर तिने तिची चौकशी केली असता तिने तिच्या घरातील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये चोरी केल्याची कबुली दिली होती. याकामी तिला तिचा प्रियकर संदीप शेजवळ याने मदत केली होती. संदीप हा तिच्या घरासह कार्यालयात नोकरीसाठी आला होता. त्यानंतर तिने तिला संबंधित सर्व दागिने आणि कॅश परत करण्यास सांगून तिने तसे केल्यास तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार नाही असे सांगितले. मात्र तिने दागिने आणि कॅश परत केले नाही. त्यामुळे तिने अमृतासह तिचा प्रियकर संदीप शेजवळ या दोघांविरुद्ध पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघांनी शुकृती शुक्ला हिच्या घरातून पावणेसात लाखांचे कानातील रिंग, वीस लाख रुपयांचे दोन हिरेजडीत अंगठ्या आणि तेरा हजार रुपयांची कॅश असा २६ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page