पासपोर्ट रॅकेटप्रकरणी सीबीआयच्या कारवाईला सुरुवात
दलालकडून १.५९ कोटीच्या कॅशसह महत्त्वाचे पुरावे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – अपुर्या आणि बोगस कागदपत्रांच्या मदतीने दलालांच्या मदतीने सुरु असलेल्या पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर आता सीबीआयने कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या अधिकार्यांनी या कटातील एका मुख्य दलालाकडून १ कोटी ५९ लाखांची कॅशसह काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केले आहेत. त्यात काही डायर्यासह तांत्रिक पुराव्यांचा समावेश आहे. या पुराव्याची सध्या शहानिशा सुरु असून त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. याच प्रकरणात चौदा पासपोर्ट अधिकार्यांसह ३२ जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींच्या घरासह कार्यालयात लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
लोअर परेल आणि मालाड येथील पासपोर्ट कार्यालयात काही पासपोर्ट अधिकारी दलालांशी हातमिळवणी करुन मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करत असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधित पासपोर्ट अधिकारी आणि काही दलाल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. अपुर्या कागदपत्रांसह बोगस दस्तावेजाच्या मदतीने दलाल पासपोर्ट अधिकार्यांच्या मदतीने ग्राहकांना पासपोर्ट देत होते. यावेही काही संशयित दलालांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडील जप्त कागदपत्रांसह मोबाईलची पाहणी केल्यानंतर संबंधित दलाल या अधिकार्यांच्या नियमित संपर्कात होते. त्यांच्याकडे पासपोर्ट कार्यालयातील काही महत्त्वाचे कागदपत्रे, सोशल मिडीयावर मॅसेज तसेच युपीआय व्यवहाराबाब काही नोंदी सापडल्या होत्या. ते आर्थिक व्यवहार पासपोर्ट अधिकारी आणि दलालांमध्ये झाल्याचे दिसून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर २९ जूनला सीबीआयने मुंबईसह नाशिक परिसरातील काही पासपोर्ट अधिकारी, दलालांच्या घरासह कार्यालयात छापेमारी केली होती. जवळपास ३३ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईत पासपोर्टशी संबंधित अनेक आक्षेपार्ह दस्तावेज आणि डिझीटल पुरावे हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयने ३२ जणांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात चौदा पासपोर्ट अधिकार्यांचा समावेश होता. गुन्हा दाखल होताच या अधिकार्यांनी एका दलालाच्या घरासह कार्यालयातून १ कोटी ५९ लाख रुपयांची कॅशसहीत काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि डायर्या जप्त केल्या आहेत. या कागदपत्रांची शहानिशा सुरु असून त्यातून अनेक धक्कादायक गोष्ट्रीचा पर्दाफाश होणार आहे.