मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक

वकिल महिलेच्या तक्रारीवरुन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका महिला वकिलाची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आले. या महिलेच्या तक्रार अर्जावरुन पवई पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.

३६ वर्षांची तक्रारदार महिला व्यवसायाने वकिल असून अंधेरीतील साकिनाका परिसरात राहते. बुधवारी ११ सप्टेंबरला दुपारी पावणेतीन वाजता ती पवईतील गॅलेरिया मॉलमध्ये आली होती. यावेळी तिच्या मोबाईलवरुन एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो टेलिकॉम ऍथोलिटी कार्यालयातून बोलत आहे. त्यांच्या नावावर एक सिमकार्ड रजिस्ट्रर झाले असून या सिमकार्डवरुन मनी लॉड्रिंग केसमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात येणार आहे. यावेळी अर्चनाने ती व्यवसायाने वकिल असून आपण अशा प्रकारे गुन्हा केला नाही किंवा सिमकार्ड घेऊन मनी लॉड्रिंग प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे अन्य एका व्यक्तीशी कॉन्फरन्स कॉलद्वारे बोलणे करुन दिले होते. या व्यक्तीने तो अंधेरी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगितले. तिचे कॅनडा बँकेत एक खाते असून त्यात मनी लॉड्रिंग झाले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी तुम्हाला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहे असे सांगून तिच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला चौकशीसाठी सहकार्य कर. ही कॉन्डीफिडेन्शिनयल चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता कोणालाही काहीही सांगू नका असे सांगितले. त्यानंतर तिने पवईतील तुंगा गाव, हॉटेल पवईमध्ये एक भाड्याने रुम घेतला होता. तिथे गेल्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला होता.

यावेळी समोरील व्यक्तीने या संपूर्ण प्रकरणात नरेश गोयल हा मुख्य आरेपी असून त्याच्यासोबत असलेल्या सहआरोपी महिलेने तिच्या अंगावर छोटी हत्यारे ठेवली आहे. तिच्या शरीरावर जखमांसह बुलेट लागल्याचे मार्क आहेत. त्यानंतर तिच्यासोबत राधिका नावाच्या एका महिलेने संभाषण सुरु केले होते. तिने तिला तिचे कपडे काढण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिने तिच्यासमोर स्वतचे कपडे काढले होते. काही वेळानंतर तिला तिने पुन्हा कपडे घालण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या बँक खात्यातून तिला काही पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. ही रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरुन तिने त्यांना पन्नास हजार रुपये पाठवून दिले होते, मात्र ही रक्कम तिला परत मिळाली नाही. त्यामुळे तिने त्यांना पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला कोणीच प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी ३१८ (४), ३१९ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ६७, ६६ (ई), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा पवई पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
केवायसी अपडेटच्या नावाने महिला व्यावसायिकाची फसवणुक
ऑनलाईन फसवणुकीच्या अन्य एका गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगाने एका व्यावसायिक महिलेची फसवणुक केली. केवायसी अपडेटच्या नावाने या ठगाने तिची ७ लाख ६४ हजाराची फसवणुक केली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सोनल मधुकांत ठक्कर ही महिला तिच्या वयोवृद्ध आई आणि मुलीसोबत वांद्रे येथे राहते. तिची स्वतची रुपासोना इन्व्हेटमेंट कंपनी असून त्यातून तिचा उदरनिर्वाह चालतो. तीन दिवसांपूर्वी घरी असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून बँकेचे केवायसी अपडेट करण्यास सांगितले होते. त्यात त्याने बँकेची एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. तिला ऑनलाईन केवायसी अपडेट करुन देतो असे सांगून त्याने तिच्या बँक खात्यासह के्रडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर तिच्या मोबाईलवर बँकेचे दहा मॅसेज आले होते. या मॅसेजमधून तिच्या बँक खात्यासह क्रेडिट कार्डवरुन ऑनलाईन व्यवहार होऊन ७ लाख ६४ हजार ६९६ रुपये ट्रान्स्फर झाल्याचे नमूद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page