तेरा वर्षांच्या अल्पवयीन नातीवर लैगिंक अत्याचार

४० वर्षांच्या चुलत आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ डिसेंबर २०२४
मुंबई, – तेरा वर्षांच्या अल्पवयीन नातीवर तिच्याच चुलत आजोबांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना पवई परिसरात घडली. याप्रकरणी ४० वर्षांच्या चुलत आजोबाविरुद्ध पवई पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

३१ वर्षांचे तक्रारदार मूळचे बिहारचे रहिवाशी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथेच वास्तव्यास आहे. त्यांची तेरा वर्षांची मुलगी असून आरोपी हा तिचा चुलत आजोबा आहे. तो सध्या पवई परिसरात राहत असून सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. गेल्या एक महिन्यांपासून तसेच रविवारी १ डिसेंबरला तक्रारदार व त्यांची पत्नी कामावर निघून गेल्यानंतर त्याने त्यांच्या मुलीवर लैथगंक अत्याचार केला होता. तसेच याबाबत कोणालाही काहीही सांगू नकोस, नाहीतर तिच्यासह तिच्या आई-वडिलांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही नव्हता. मात्र रविवारी आरोपीने तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. हा प्रकार समजताच तिच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी नातेवाईकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मालवणीत अकरा वर्षांच्या मुलावर अत्याचार
दुसर्‍या घटनेत एका अकरा वर्षांच्या मुलावर लैगिंक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तौसिक खान या २५ वर्षांच्या तरुणाविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तौसिक हा याच परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ३३ वर्षांचे तक्रारदार मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून अकरा वर्षांचा पिडीत त्यांचा मुलगा आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मुलगा घरासमोरच खेळत होता. यावेळी तिथे फास्ट फुडवाला हॉटेलमध्ये काम करणारा तौसिक आला आणि त्याने त्याला जवळच्या हॉटेलमध्ये आणले होते. हॉटेलच्या पोटमाळ्यावर आणल्यानंतर त्याने त्याच्याशी लगट करुन लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने त्याला घरी पाठवून दिले होते. घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तौसिक याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page