कर्जबाजारी झाल्याने चोरी करणार्या डिलीव्हरी बॉयला अटक
चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल तर 2.85 लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – कर्जबाजारी झाल्याने घरात घुसून चोरी करणार्या एका डिलीव्हरी बॉयला पवई पोलिसांनी अअक केली. शैलेश राजाराम गांगुर्डे असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो घाटकोपरचाा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिन्ही गुन्ह्यांतील 2 लाख 85 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यातील तक्रारदार पवई परिसरात राहत असून एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहे. 2 जुलैला त्यांच्या घरी चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांचा दोन लाखांचा मॅकबुक, आयफोन चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, महिला पोलीस उपनिरीक्षक मायाचारी, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, आदित्य झेंडे, संदीप सुरवाडे, पोलीस शिपाई सूर्यकांत शेट्टी, संदीप राठोड यांनीघाटकोपर येथून शैलेश गांगुर्डे याला ताब्यात घेतले.
चौकशीत तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. डिलीव्हरीच्या नावाने तो घरात घुसून चोर्यामार्या करत होतो. त्याने चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाखांचे अॅपल कंपनीचे प्रो एम चार मॅकबुक, साठ हजाराचा आयफोन 15 मोबाईल, दहा आणि पंधरा हजाराचे रेडमी आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल असा 2 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला कर्ज झाले होते. कर्जबाजारी झाल्याने तो चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधून तो चोरी करुन पळून जात होता. मात्र पवईतील चोरीनंतर त्याला सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.