मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पवईतील रॉयल पाम स्पामध्ये मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी जैद ऊर्फ आमीर मोहम्मद मुस्तफा अन्सारी या 25 वर्षांच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात ाअला असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली असून मेडीकलनंतर तिला मानखुर्दच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत स्पाचा मालक दिनेश याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पवईतील चांदीवली, साकीविहार रोड, तुंगा व्हिलेज, गुरुकृपा हॉटेजवळील अॅव्हेन्यू सहकारी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर रॉयल पाम नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने तिथे काम करणार्या महिलांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले जाते. स्पाचा मालक आणि मॅनेजर याच महिलेच्या मदतीने स्पामध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे एका बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा केली होती.
या बोगस ग्राहकाने स्पामध्ये या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली असता त्याला तिथे एका महिलेसोबत शारीरिक संबंधासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. त्याने होकार दर्शवून पोलिसांना तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचा सिग्नल दिला होता. या बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने छापा टाकला होता. यावेळी स्पामध्ये असलेल्या मॅनेजर जैद ऊर्फ मोहम्मद मुस्तफा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी तिथे असलेल्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिथे तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे सांगितले.
जैद हा मालक दिनेश यांच्यासोबत स्पामध्ये येणार्या ग्राहकांना त्यांच्यासोबत शारीरिक संबंधासाठी पाठवतो, त्यातील मिळणार्या रक्कमेचा काही हिस्सा त्यांना दिल्यानतर उर्वरित रक्कम स्पाच्या गल्ल्यात जमा केला जात होता. हा प्रकार उघडकीस येताच जैदला पोलिसांनी अटक केली तर बळीत महिलेची मानखुर्दच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली.