अंधेरीतील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेसह दोघांना कारावास

वेश्यादलाल महिलेस सात तर शारीरिक संंबंध ठेवणार्‍या दहा वर्षांची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – अंधेरीतील एका निवासी सोसायटीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी एका महिलेसह दोघांना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावणी आहे. विनय फत्तेबहादूर पाठक आणि रेणू गणेश मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत. यातील विनयला दहा वर्षांच्या कारावासासह वीस हजाराचा दंड तर रेणूला सात वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनयला रेणूच्या सांगण्यावरुन पिडीत मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

अंधेरीतील कनकिया एसआरए सोसायटीच्या चवथ्या मजल्यावरील बी/404 मध्ये रेणू मिश्रा ही महिला राहत असून ती अल्पवयीन मुलीच्या मदतीने तिच्या राहत्या घरी सेक्स रॅकेट चालविते. या मुलींना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने 30 मे 2023 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता रेणू मिश्राच्या राहत्या घरी छापा टाकला होता. यावेळी तिथे विनय पाठक हा ग्राहक बनून आला होता. त्याने बळीत मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

याच गुन्ह्यांत नंतर विनय पाठक आणि रेणू मिश्रा या दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. तिला नंतर बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच दोन्ही आरोपीविरुद्ध दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. याच दरम्यान विनय राठोडला कोर्टाने जामिन मंजूर केला होता तर रेणू ही न्यायालयीन कोठडीत होती. या खटल्याची नियमित सुनावणी पोक्सो कोर्टात सुरु होती.

27 फेब्रुवारीला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी विनयला दहा वर्षांच्या कारावासासह वीस हजार रुपयांचा दंड आणि रेणू मिश्रा हिला सात वर्षांच्या कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यांचा तपासासह आरोपींना शिक्षा होण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखालीी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, तुकाराम कोयंडे, महेश गुरव, सहाय्यक फौजदार चोरगे, कोर्ट कारकून महिला पोलीस शिपाई दिपाली दुधवडकर, महिला पोलीस हवालदार ज्योत्सना जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page