मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – माालाडच्या मालवणी परिसरात गस्त घालणार्या पोलीस पथकावर हल्ला करणार्या पिता-पूत्रांना मालवणी पोलिसांनी अटक केली. पियुष रमेश कोटक, अंकुश पियुष कोटक आणि मोहित पियुष कोटक अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मालवणीती एम. एच कॉलनीतील रहिवाशी आहे. हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेले होते. त्यांच्यावर पोलीस पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करणे, एका पोलीस कर्मचार्यावर चाकूने हल्ला करुन कसरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी 1 डिसेंबरला रात्री पाऊणच्या सुमारास मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक सात, बीट चौकी दोनमध्ये घडली. कुमार भिमराव गायकवाड हे कल्याण येथे राहत असून सध्या मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत गेट क्रमांत सात, बीट क्रमांक दोनजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे पियुष कोटक व त्याचे दोन मुले अंकुश आणि मोहित यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यावेळी पोलीस हवालदार तांडेल यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्याला विरोध करुन अंकुशने त्याच्याकडील चाकूने तांडेल यांच्या हातावर वार केले होते. त्यांच्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर या तिघांसह त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी पोलीस शिपाई सोरटे, पोलीस हवालदार वलेकर यांना हाताने धक्काबुक्की करुन खाली पाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग करताना त्यांनी पोलीस पथकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या यांच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी आरोपी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिघांनाही पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना पियुष या पित्यासह त्याचे दोन मुले अंकुश आणि मोहित या तिघांनाही मालाडच्या मालवणी परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोन्ही महिलांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.