स्वातंत्र्यदिनानिमित्त अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज
शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले असून शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व सहपोलीस आयुक्त, सहा अतिरिक्त पोलीस आयुक्तासह मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी फोर्स वन, एसारपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट आणि होमगार्ड आदींची मदत घेतली जाणार आहे.
शुक्रवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन असल्याने विविध राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रयत्न उपस्थित होऊ नये म्हणून अलीकडेच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत शहरातील बंदोबस्ताबाबत चर्चा करुन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.
स्वातंत्र्यदिन उत्साहात, सुरक्षितपणे, निर्विघ्नपणे साजरा करता यावा तसेच वाहतूक नियमनासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात सहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, सतरा पोलीस उपायुक्त, 39 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2529 पोलीस अधिकारी आणि 11 हजार 682 पोलीस अंमलदार आदींचा बंदोबस्ताकामी तैनात करणत आले आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी फोर्स वन, एसारपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट आणि होमगार्ड आदींची मदत घेतली जाणार आहे.
मुंबई पोलिसांना जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशनसह गस्त घालण्याचे तसेच नाकाबंदी करा. संशयित व्यक्तीसह वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश देणयात आले आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या शासकीय इमारती, मंत्रालय, विधानभवनासह धार्मिक स्थळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सव उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करावा. पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक 100 किंवा 112 वर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.