पोलीस भरतीचा अवलंबला शॉटकट

चिपची अदलाबदल आणि वेळेत केला फेरफार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भावी पोलिसाने मैदानी धावणी चाचणी दरम्यान चिपची अदलाबदली आणि वेळेत फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी चारजणाविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत.

तक्रारदार हे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात. सध्या मुंबई पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती सुरु आहे. मंगळवारी तक्रारदार हे मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात हजर झाले. चाचणीसाठी काही उमेदवार हे मैदानात आले. मैदानात १०० मीटर आणि १६०० मीटर धावण्याची चाचणी होती. धावणाऱ्या उमेदवारांना पायात चिप दिली होती. सायंकाळी धावत असताना एक उमेदवार हा खाली पडला. खाली पडल्याने तो १०० मीटर धावू शकला नाही.

त्याच्या पायातील चीप काढून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस शिपाई या गुणपत्रिका घेऊन सर्व्हर रूम मध्ये गेल्या. त्या उमेदवाराने १०० मीटर अंतर पार केल्यानंतर त्याचे गुण जनरेट होत नव्हते. त्यामुळे महिला पोलीसने त्या उमेदवाराकडे चौकशी केली. तेव्हा त्या उमेदवाराने चीप ची अदलाबदली केल्याचे सांगितले. त्या माहितीनंतर महिला पोलीसने दुसऱ्या उमेदवाराची चीप तपासली.

त्या उमेदवाराला १०० मीटर धावण्याच्या चाचणीत १५ पैकी १० गुण मिळवून देण्यासाठी चीप बदलली. त्यानंतर आणखी दोन उमेदवाराने देखील १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत ४०० मीटरचे ४ ऐवजी ३ राउंड पूर्ण केला. चौथा राऊंड पूर्ण करत असताना त्या उमेदवार शॉर्ट कट घेऊन ट्रॅक च्या बाहेर आले. चीप स्कॅन करून टाइम मध्ये फेरफार करून पोलिसांची दिशाभूल केली. घडल्या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पवई पोलिसांनी चार उमेदवारा विरोधात दोन गुन्हे नोंद केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page