32 वर्षांच्या प्रशिक्षार्थी पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेयसीच्या पालकांकडून येणार्‍या धमक्यांना कंटाळून जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – सांताक्रुज येथील कालिना पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षार्थी पोलीस शिपाई भैयासाब भिमराव व्हावळे या 32 वर्षांच्या पोलीस शिपायाने त्याच्या राहत्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या पालकांचा त्यांच्या प्रेमसंबधासह विवाहाला विरोध होता, त्यातून ते त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना धमकी देत होते. याच धमक्याला कंटाळून तसेच त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून भैयासाबने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी एक सुसायट नोट जप्त केली असून त्यातून हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध भैयासाबला धमकावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

ही घटना रविवारी 15 मार्चला रात्री साडेबारा ते दुसर्‍या दिवशी सकाळी पावणेदहाच्या सुमारास सांताक्रुज येथील कालिना पोलीस मुख्यालय, बी विंग विंगच्या दुसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक चारमध्ये घडली. भिमराव मारुती व्हावळे हे मूळचे परभणी येथील गंगाखेड, गेगाखेडच्या खादगावचे रहिवाशी आहेत. त्यांना दोन मुली असून त्या दोघीचे लग्न झाले आहेत. भैयासाब हा त्यांचा मुलगा असून तो मुंबई पोलीस दलात भरती झाला आहे. सध्या सांताक्रुज येथील कालिना पोलीस कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणानंतर तो कालिना पोलीस दलातील बी विंग, रुम क्रमांक चारमध्ये राहत होता. भैसासाब हा फेब्रुवारी 2026 साली मुंबई पोलीस दलात चालक म्हणून रुजू झाला होता.

त्याचे एका तरुणीशी गेल्या दिड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती नांदेडची रहिवाशी असून तिच्या वडिलांनी तिच्या विवाहासाठी मुलगा बघण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे तिने तिचे भैयासाबशी प्रेमसंबंध असल्याची माहिती सांगून तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले होते, मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला आणि विवाहाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी त्याला फोनवरुन बघून घेण्याची धमकी दिली होती. जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवतो असे सांगून त्याला धमकावत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी त्याच्या घरच्या लोकांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे भैयासाब हा प्रचंड मानसिक तणावात होता.

त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने रविवारी रात्री साडेबारा ते सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्याच्या कालिना पोलीस मुख्यालयातील बी विंग, दुसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक चारमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी हा प्रकार त्याच्या सहकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्या वरिष्ठांसह वाकोला पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळी गेलेल्या वाकोला पोलिसांनी त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या खिशात पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्यांनी संबंधित माहिती दिली होती.

प्रेयसीच्या पालकांकडून येणार्‍या धमक्यांना कंटाळून तसेच त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केली होती. सुसायट नोटमधील हस्ताक्षर भैयासाब याचेच असल्याचे त्याचे वडिल भिमराव व्हावळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी भैसासाबला धमकावून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page