स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 49 पोलिसांना राष्ट्रपती पदक
सात शौर्य, तीन उल्लेखनीय तर 39 गुणवत्तापूर्व सेवेसाठी पदक जाहीर
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना उत्कृष्ठ सेवेसह शौर्य आणि गुणवत्तापूर्वक राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे. त्यात सातजणांना शौर्य, तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी तर 39 जणांना गुणवत्तापूर्वक सेवेचा समावेश आहे. त्यात वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्ढी, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, ज्योती देसाई, राजन मोने आदींचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील 1 हजार 90 पोलिसांना विविध सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केले असून त्यात महाराष्ट्र पोलीस दलातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. सात पोलिसांना शौर्य, तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी तर 39 जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. सात पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी सुखदेव बंडगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर कोटला महाका, हेड कॉन्स्टेबल मनोहर लचमा पेंडम, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश ईश्वर कन्नाके, अतुल सत्यनारायण योगोळपवार, हिदायत सददुल्ला खान आणि सुरेश लिंगाजी तेलमी (मरणोत्तर) यांचा समावेश आहे. तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यात पोलीस महानिरीक्षक अनिल दशरथराव कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र दत्ता रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचा समावेश आहे.
39 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र रघुनाथ धिवार, ज्योती अरविंद देसाई, राजन आबाजी माने, कैलास मनोहर पुंडकर, राजन आबाजी माने, नरेंद्र कृष्णराव हिवरे, प्रमोदकुमार परशुराम शेवाळे, दत्तात्रय शंकर ढोले, पोलीस उपधिक्षक संजय सुभाष चंदखेडे, पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अंबुजी वाणी, निरीक्षक आंचल ईश्वरप्रसाद मुद्रल, दिपककुमार चुडामन वाघमारे, सत्यवान आनंद माशाळकर, ओहरसिंग द्वारका पटेल, विश्वास रोहिदास पाटील, सतीश भगवान जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप शांताराम शिंदे, संदीप यशवंत मोरे, काशिनाथ दत्ता राऊळ, जोसेफ मेरीयन डिसिल्वा, सुनिल भाऊराव चौधरी, आनंदराव मारुती पवार, अनिल कृष्णराव ब्राम्हणकर, उभाष मधुकर हांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ, दिपक सुगनसिंग परदेशी, अशोक सोनू जगताप, पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब यशवंत भलचीम, रमेश नत्थुजी ताजने, अविनाश रामभाऊ नवरे, अनंत विष्णूपंत व्यवहारे, धोंडिबा माधवराव भुट्टे, हर्षकांत काशिनाथ पवार, प्रमोद कारभारी पवार, राजेंद्र गोपाळराव मोरे, जितेंद्र जगन्नाथ कोंडे, संजय दामोदर शिरसाट, सहाय्यक पोलीस कमांडर सुरेश दिगंबर कराळे, रमेश बबन वेठेकर, हेड पोलीस कॉन्स्टेबल संजीवकुमार काशी माथुर, रमेश खुशालराव कुंभलकर यांचा समावेश आहे.