राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या बढती व बदल्या

चौदा एसीपी तर दहाजणांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या शनिवारी रात्री उशिरा बढतीसह बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अठरा सहाय्यक पोलीस आयुक्तासह दहा पोलीस निरीक्षक असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे चौदा सहाय्यक पोलीस आयुक्त तर ३३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
अलीकडेच सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करणयात आली आहे. या पोलीस अधिकार्‍यांमध्ये ठाणे शहराचे महेंद्र नाथा नेर्लेकर यांची मुख्य नियंत्रण कक्ष, खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडुरंग मुळीम यांची पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त, काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय राजाराम मोहिते यांची रायगडच्या पोलीस उपअधिक्षक-जात प्रमाणपत्र आणि पडताळणी विभाग, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक राजाराम चव्हाण यांची सोलापूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधिक्षक, माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बाबूराव शिरसाट यांची मुंबई लोहमार्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त, देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक गणपतराव शेळके यांची डोंगरी विभाग, व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार केशव शिंदे यांची गुन्हे शाखा, बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद मधुकर सावंत यांची वाहतूक विभाग, विशेष शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मदन ओझा यांची आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायरस बोमण इराणी यांची वाहतूक विभाग, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश रमेश तावडे यांची वाहतूक विभाग, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर रायभान वाघ यांची गिरगाव विभाग, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका शुभराज बुवा यांची चेंबूर विभाग, नेहरुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहम्मद युसूफ माजिद सौदागर यांची विशेष शाखा एक, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रिनम नामदेव परब यांची आर्थिक गुन्हे शाखा, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निवृत्ती मुरकुटे यांची कुर्ला विभाग, विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर वसंतराव हिर्डेकर यांची गुन्हे शाखा, जे. जे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलाम कौसर ऐनोद्दीन शेख यांची संरक्षण व सुरक्षा विभाग विभागात बदली करण्यात आली आहे.
चौदा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
चौदा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या शनिवारी बदल्यांचे आदेश जारी कर्‍यात आले होते. त्यात भोईवाडा व गोरेगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना सूर्यकांत गाडेकर व रेणुका विशाल बागडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, ओशिवरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत गणपत बांगर यांची साकिनाका विभाग, मालवणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र रघुनाथ धिवार यांची सायन विभाग आणि साकिनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरतकुमार इंद्रसेन सूर्यवंशी यांची सशस्त्र पोलीस नायगाव, दक्षिण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत शंकर माने यांची दादर विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव महादेव पोळ यांची वांद्रे विभाग, संरक्षण व सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत मधुसूदन सावंत यांची भोईवाडा विभाग, सशस्त्र पोलीस नायगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत बबनराव काटकर यांची ओशिवरा विभाग, घाटकोपर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निता अशोक पाडवी यांची मालवणी विभाग, अमरावती व नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत पंढरीनाथ राजे व शैलेश दिगंबर पासलवार यांची अनुक्रमे गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश हिंदुराव चौगुले यांची विशेष शाखा एक, मिरा-भाईंदर-वसई आणि विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग बाळासाहेब बागल यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.
३३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
इतर बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील ३३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद नामदेव जाधव यांची विशेष शाखा एक, गोराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी रामचंद्र नरोटे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी रघुनाथ घोरपडे यांची विशेष शाखा एक, आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाचे यांची सशस्त्र पोलीस नायगाव, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत बच्वाराम शिंदे यांची सशस्त्र पोलीस वरळी, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन रामचंद्र माने यांची विशेष शाखा एक, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर शांताराम कुडाळकर यांची सशस्त्र पोलीस मरोळ, गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन रघुनाथ होनवाडकर यांी विशेष शाखा एक, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरवाडी पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मधुकर काटे यांची जे. जे मार्ग पोलीस ठाणे, व्ही. बी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शिवाजीराव चव्हाण यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन श्रीरंग खरात यांची गुन्हे शाखा, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश धनंजय निवतकर यांची गुन्हे शाखा, सशस्त्र पोलीस मरोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भगवान क्षीरसागर यांची गोराई पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश सोपान मच्छींदर यांची अंधेरी पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे रविंद्र वसंत क्षीरसागर यांची व्ही. बी नगर पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पांडुरंग सपकाळ यांची बीकेसी पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल बाबूराव ठाकरे यांची बांगुरनगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पंढरीनाथ झिपरु पाटील यांची गोवंडी पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मुरारी कदम यांची भोईवाडा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश जगनाथ कुलकर्णी यांची व्ही. पी रोड पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव पवार यांची माटुंगा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे राजेश रघुनाथ कासारे यांची माहीम पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कृष्णा दळवी यांची आझाद मैदान पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन शंकर तडाखे यांची एल. टी मार्ग पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी तुळशीराम जाधव यांची मेघवाडी पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे सचिन सखाराम गावडे यांची ताडदेव पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश भगवान बळवंतराव कांजूरमार्ग पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ तुकाराम कोळेकर यांची गावदेवी पोलीस ठाणे, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पोपट रणदिवे यांची आरएके मार्ग पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु अरुण घोरपडे यांची मानखुर्द पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सत्तारअली सय्यद यांची देवनार, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत शिवराम नाईकवाडी यांची विक्रोळी पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव दत्तात्रय धुमाळ यांची खार पोलीस ठाणे
दहा पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती
पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दहा पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात ताडदेवचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार रामकृष्ण गाठे यांची विशेष शाखा एकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपाडा पोलीस ठाण्याचे संजय मल्हारराव निंबाळकर यांची आग्रीपाडा पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे राजीव यादवराव शेजवळ यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष सुरेश श्रीधनकर यांची काळाचौकी, आर्थिक गुन्हे शाखेचे सुनिल शिवाजी रसाळ यांची आर्थिक गुन्हे शाखा, कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव दशरथ गावडे यांची वाहतूक विभाग, विशेष शाखा एकचे मोहीनी मनिष मोहाडीकर यांची विशेष शाखा एक, सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे मुख्यार दाऊद शेख यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, नेहरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश गहिनीनाथ खेडकर यांची नेहरुनगर पोलीस ठाणे, पार्कसाईट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास वामनराव दातीर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदाच्या ७ हजार ९३० पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्याचे आदेश शनिवारी रात्री उशिरा जारी करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page