राज्य पोलीस दलातील चौदा पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

बदल्यांमध्ये पोलीस उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधिक्षकाच्या गुरुवारी बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. या अधिकार्‍यांना तातडीने त्यांच्या नव्याने नियुक्त केलेल्या जागी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह नागपूरचे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपअधिक्षक विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा यांची नागपूरच्या नक्षल विरोधी अभियान-विशेष कृती दलाच्या पोलीस उपअधिक्षक, अमराती ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी शिवलाल शंकरराव भगत यांची चंदूरच्या उपविभागीय अधिकारी, नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव धुराजी नवले यांची सातार्‍याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पांडुरंग लगारे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या सहाय्यक पोलीस आयुक्त, सांगली मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल जॉन बेन यांची नांदेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, चंदूपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल उमाकांत झरकर यांची गोंदिया येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली तुकाराम कदम यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, सातार्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर सिद्राम भुजबळ यांची मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त, सातारा ्रग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास त्रिंबकराव शिंदे यांची गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य कल्पना सुनिल बारवकर यांची अमरावतीच्या पोलीस उपायुक्त, नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण विनायक तेजाळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त, सांगलीचे गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक राजन हिंदुराव सस्ते यांची रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन तुळशीराम राठोड यांची महाराष्ट्र राज्य लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक येथे बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page